rajnath singh

तालिबानची वाढती शक्ती जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीसाठी धोका बनू शकते, अशी भीती भारतीय शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानातून उद्भवलेल्या तालिबानी दहशतीचा धोका येथे पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय-5 चे प्रमुख केन मॅकलम म्हणाले की, अफगाणिस्तानात तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर पुन्हा 9/11 सारखा हल्ला होऊ शकतो. अफगाणिस्तानवर तालिबानच्या नियंत्रणामुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढेल आणि याचा अर्थ 9/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यांची भीती कायम आहे.

    दिल्ली : तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती गंभीर आहे. याचे पडसाद जगभर उमटताना दिसत आहे. तालिबानचा उदय भारतासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तानातील तालिबानी राजवट भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंतेचा विषय ठरते आहे. तालिबानच्या मदतीने अफगाणिस्तानमध्ये बेस बनवून काही अन्य दहशतवादी संघटना शांततेसाठी धोकादायक ठरू शकतात, अशी भीती वर्तविली जात असतानाच, देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, अफगाणिस्तानचा वापर इतर कोणत्याही देशावर हल्ला करण्यासाठी किंवा कोणालाही धमकवण्यासाठी केला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तविली आहे.

    जम्मू-काश्मीरमधील शांततेसाठी धोकादायक

    तालिबानची वाढती शक्ती जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीसाठी धोका बनू शकते, अशी भीती भारतीय शिष्टमंडळाने व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानातून उद्भवलेल्या तालिबानी दहशतीचा धोका येथे पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, ब्रिटनची गुप्तचर संस्था एमआय-5 चे प्रमुख केन मॅकलम म्हणाले की, अफगाणिस्तानात तालिबानने नियंत्रण मिळवल्यानंतर पुन्हा 9/11 सारखा हल्ला होऊ शकतो. अफगाणिस्तानवर तालिबानच्या नियंत्रणामुळे दहशतवाद्यांचे मनोबल वाढेल आणि याचा अर्थ 9/11 सारख्या दहशतवादी हल्ल्यांची भीती कायम आहे.

    आयएस समर्थक देशाच्या वेशीवर

    अफगाणिस्तानात तालिबानी सरकार आल्यानंतर संपूर्ण जगभरातील समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यातच आता समोर आलेल्या माहितीनुसार, गुप्तचर अधिकाऱ्यांना याबाबतची दाट शक्यता आहे की, इस्लामिक स्टेटशी निष्ठा आणि समर्थक असा 25 भारतीयांचा एक गट अफगाणिस्तानातून भारतात येत आहे. गेल्या महिन्यात अफगाणिस्तान ताब्यात आल्यानंतर तालिबानने विविध तुरुंग तोडून टाकले. यानंतर असे म्हटले जात आहे की हे भारतीय देशात येतील. त्यामुळे आता भारतासाठी मोठा धोका मानले जात आहे. हे सर्व 25 भारतीय राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) दहशतवादी गट आयएसशी संबंध असल्याच्या यादीत आहेत. एनआयएच्या अधिकाऱ्यांच्या मते, त्यांना या भारतीयांच्या सद्यस्थितीबाबत काही माहिती नाही. परंतु तपासात असे दिसून आले आहे की हे सर्व अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतात आयएसमध्ये सामील झाले होते.