The risk of corona infection is higher if the car windows are closed

दिल्ली : कोरानाच्या संसर्ग टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत अनेक सूचना केल्या जात आहेत. दरम्यान, करोनाच्या संसर्गाबाबत नवी माहिती समोर आली आहे.  प्रवासादरम्यान कारच्या काचा बंद असल्यास करोनाचा धोका वाढतो अशी महत्वाची बाब अभ्यासातून समोर आली आहे.

अमेरिकेच्या ब्राउन युनिव्हर्सिटीने या संदर्भात एक संशोधन केले. या संशोधनातून ही माहिती समोर आली आहे.  कार चालवताना एसी सुरु असल्यास आणि चारही काचा बंद असल्यास  करोनाचा धोका वाढू शकतो. कारमध्ये हवा खेळती असल्यास विषाणूंचा फैलाव होण्याचा धोका कमी  असतो असा निष्कर्षही या संशोधनातून समोर आला आहे.

कारच्या सर्व काचा बंद असल्यास कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका हा चालकाला असतो असेही ब्राउन युनिव्हर्सिटीचे म्हणणे आहे. हवेचा प्रवाह मागच्या बाजूने पुढच्या बाजूला सुरु असतो. त्यामुळे मागे बसलेल्या व्यक्तीच्या शिंकण्यातून उडणारे तुषार चालकापर्यंत सहज पोहोचू शकतात. यामुळे चालकाला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो.

कारमध्ये प्रवासादरम्यान इतर प्रवाशांना घेताना हवेचा प्रवास व्यवस्थित करुन घेतल्यास संक्रमणाचा धोका कमी केला जाऊ शकतो. कारमधून प्रवास करताना चारही खिडक्या खुल्या असणं गरजेचं असल्याचे संशोधनात म्हंटले आहे.