सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि..; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

भारताच्या लोकशाहीचे नेहरू आणि वाजपेयी हे दोन आदर्श नेते होते आणि दोघेही मी माझ्या लोकशाहीचे सन्मानाचे पालन करीन असे म्हणायचे. अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.

    नवी दिल्ली – भारताचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अटल बिहारी वाजपेयी हे आदर्श नेते असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. तसेच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे आणि सन्मानाने वागले पाहीजे, असेही नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

    एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी म्हटले की, भारताच्या लोकशाहीचे नेहरू आणि वाजपेयी हे दोन आदर्श नेते होते आणि दोघेही मी माझ्या लोकशाहीचे सन्मानाचे पालन करीन असे म्हणायचे. अटलजींचा वारसा आमची प्रेरणा आहे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचेही भारतीय लोकशाहीमध्ये मोठे योगदान असल्याचे गडकरी यावेळी म्हणाले.

    अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी तीन कृषी कायद्यांविरोधात, इंधन दरात वाढ आणि पेगॅसस स्पायवेअरवरुन गोंधळ घातला होता. गोंधळावरुन गडकरी म्हणाले की, सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांना एकदा आत्मपरीक्षण करू द्या. कारण जो आज विरोधीपक्ष आहे, तो उद्या सत्ताधारी असणार आहे. तर आजचा सत्ताधारी पक्ष उद्याचा विरोधी पक्ष असणार आहे.