पाकिस्तानातून परतलेल्या गीताला गवसले ‘माता-पिता’; ‘डीएनए’ टेस्टनंतर खरं नाव आणि गावही मिळालं

ती ११ वर्षांची मूक-बधीर ! पाकिस्तानात जाणाऱ्या रेल्वेत चुकीने बसली. रेल्वे थांबली तेव्हा कळले की, आपण भारत सोडून पाकिस्तानात आलोय. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात ती आपल्या माता-पित्यास शोधण्यासाठी परत भारतात आली.

    दिल्ली (Delhi).  ती ११ वर्षांची मूक-बधीर ! पाकिस्तानात जाणाऱ्या रेल्वेत चुकीने बसली. रेल्वे थांबली तेव्हा कळले की, आपण भारत सोडून पाकिस्तानात आलोय. भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात ती आपल्या माता-पित्यास शोधण्यासाठी परत भारतात आली. अखेर तिचा शोध पूर्ण झाला आणि साडेचार वर्षांनंतर तिला तिचे आई-वडील गवसले.

    गीता उर्फ राधा वाघमारे असं तिचं नाव. तशी मूळची नायगाव येथील राहणारी ! ती महाराष्ट्राच्या नायगाव या गावातील आहे. राधाच्या आईचं नाव मिना असून तिच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. गिता ही आपली मुलगी आहे असे अनेकांनी दावे केले होते. त्यानंतर दावेे करणारे आणि राधाचं डीएनए टेस्ट केल्यानंतर तिला तिचं खरं नाव आणि गाव भेटलं आहे. गेल्या साडेचार वर्षापासून तिला तिच्या घराच्यांची प्रतिक्षा होती.

    चुकून पाकिस्तानात गेलेली राधा कराचीच्या रेल्वे स्टेशनवर ईधी नावाच्या एका सामाजिक संस्थेला ती सापडली. तिला बोलता आणि ऐकू येत नव्हतं. त्यामुळं तीचं नाव फातिमा असं ठेत वण्याआलं. मात्र, तिच्या वागण्यावरून ती मुस्लिम वाटत नव्हती. हिंदू समाजाची असल्याची कळताच तिचं नाव गिता ठेवण्यात आलं होतं. 2015 मध्ये सुषमा स्वराज यांनी तिला मायदेशी परत आणलं होतं.

    दरम्यान, ईधी संस्थेच्या बिलकीस ईधी यांना राधाने फोन करून माहिती सांगितली. पाकिस्तानच्या ‘द डाॅन’ या वृत्तपत्राने याबद्दलची माहिती दिली आहे. राधा तिच्या घरच्यांना भेटून खुश असल्याचं तिनं म्हटलं आहे.