राफेल विमान
राफेल विमान

दिल्ली (Dehli). टू स्टार अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली इंडियन एअर फोर्सची एक टीम सध्या फ्रान्समध्ये 'राफेल' फायटर विमान प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी असून पुढच्या काही आठवड्यात अंबाला एअर बेसवर राफेल फायटर विमानांची दुसरी तुकडी दाखल होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. फ्रान्सला 36 राफेल विमानांची भारताने ऑर्डर दिली आहे. 29 जुलै रोजी अंबाला एअरबेसवर त्यातील पाच विमाने दाखल झाली होती.

  • फ्रान्सला ३६ राफेल विमानांची भारताने दिली ऑर्डर

दिल्ली (Dehli). टू स्टार अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली इंडियन एअर फोर्सची एक टीम सध्या फ्रान्समध्ये ‘राफेल’ फायटर विमान प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी असून पुढच्या काही आठवड्यात अंबाला एअर बेसवर राफेल फायटर विमानांची दुसरी तुकडी दाखल होईल, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. फ्रान्सला 36 राफेल विमानांची भारताने ऑर्डर दिली आहे. 29 जुलै रोजी अंबाला एअरबेसवर त्यातील पाच विमाने दाखल झाली होती. ही विमाने एकदिवस फ्रान्स ते भारत या प्रवासात अबूधाबीमधील अल धाफ्रा येथील एअर बेसवर थांबली होती.

राफेल विमाने 10 सप्टेंबरला औपचारिकरित्या समारंभपूर्वक इंडियन एअर फोर्सचा भाग झाली. आणखी तीन ते चार राफेल विमाने पुढच्या काही आठवड्यात भारतात दाखल होतील. भारताची हवाईशक्ती चीन-पाकिस्तान सीमेवर तणाव असताना, 4.5 जनरेशनच्या या फायटर विमानांमुळे कैकपटीने वाढणार आहे. राफेल अनेक विमानांचे काम एकटे करू शकते. राफेल विमाने भारताकडे दर दोन महिन्यांच्या अंतराने तीन ते चार सोपवली जातील अशी अपेक्षा इंडियन एअर फोर्सला आहे.

रशियन सुखोई-30 विमाने जून 1997 मध्ये इंडियन एअर फोर्सला मिळाल्यानंतर 23 वर्षांनी नवीन फायटर विमान एअर फोर्सच्या ताफ्यात दाखल झाले आहे. सध्या चीनबरोबर प्रचंड तणाव असलेल्या लडाख क्षेत्रातही, गरज पडल्यास राफेल विमानांचा वापर करण्यासाठी आयएएफ सज्ज आहे. चीनच्या चिथावणीखोर कृत्यांमुळे येथे लष्कर हाय-अलर्टवर आहे.