परिस्थिती हाताबाहेर : घरातही मास्क लावायची वेळ; केंद्राचा इशारा

केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून देशवासियांना सावध केले आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. त्यामुळे आता घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

    दिल्ली : केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या संसर्गावरून देशवासियांना सावध केले आहे. कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. त्यामुळे आता घरातही मास्क लावण्याची वेळ आली आहे, असे केंद्राने म्हटले आहे.

    महिलांनी मासिक पाळीत लस घेऊ नये, त्यामुळे रिअॅक्शन होण्याची शक्यता असते. अशा आशयाचे मेसेज गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावरही केंद्राने स्पष्टीकरण दिलं आहे. मासिक पाळीतही महिला इंजेक्शन घेऊ शकतात. ही लस पूर्णपणे सुरक्षित आहे, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

    रेमडेसिवीर इंजेक्शन हे संजीवनी नसल्याचेही केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा साठा करणेही योग्य नाही. कोरोनाच्या संसर्गाच्या सुरुवातीला रेमडेसिवीर घेतल्याने काहीही फायदा होत नाही. सौम्य लक्षणे असतील तर इतर सपोर्टिव्ह ट्रीटमेंटनेही रुग्ण बरा होतो.

    काढा, घरगुती उपाय, वाफ घेणे, गुळणी करणे आदी गोष्टी केल्यानेही कोरोनाची सौम्य लक्षणे असलेला रुग्ण बरा होतो. त्यामुळे पॅनिक होऊ नका, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केले आहे.