The secret of the world unfolding at the bottom of the ice? Scientists expedition in Antarctica

बर्फाच्छादित प्रदेश असलेल्या अंटार्टिका खंडाने आपल्या पोटात जगाचे अनेक रहस्य लपवून ठेवले आहेत. या ठिकाणी मोठा खड्डा करून त्या जुन्या बर्फापर्यंत पोहोचणे म्हणजे टाईम ट्रॅव्हल करुन इतिहासात जाण्यासारखे असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. शास्त्रज्ञांना असा विश्वास आहे की, यातून ते मोठा इतिहास शोधून काढतील.

  दिल्ली : जगातील सर्वात जुन्या बर्फाच्या शोधात असणाऱ्या युरोपियन शास्त्रज्ञांच्या टीम एक मोठे संशोधन करण्याच्या तयारीत आहे. 1.5 दशलक्ष वर्षांपुर्वीचा हा बर्फ अंटार्क्टिकामध्ये असल्याचे आढळल्यानंतर शास्त्रज्ञांनी त्या बर्फापर्यंत पोहोचण्यासाठी मोठा खड्डा करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी आता अंटार्क्टिकामध्ये तब्बल 1.5 मैल म्हणजेच 2.7 किमीचा खड्डा खोदला खोदला जाणार आहे.

  बर्फाच्छादित प्रदेश असलेल्या अंटार्टिका खंडाने आपल्या पोटात जगाचे अनेक रहस्य लपवून ठेवले आहेत. या ठिकाणी मोठा खड्डा करून त्या जुन्या बर्फापर्यंत पोहोचणे म्हणजे टाईम ट्रॅव्हल करुन इतिहासात जाण्यासारखे असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. शास्त्रज्ञांना असा विश्वास आहे की, यातून ते मोठा इतिहास शोधून काढतील.

  ज्यामध्ये भुतकाळातील वेगवेगळ्या गोष्टींचे अवशेष सापडू शकतात. ज्यामध्ये हिमवादळांमुळे जमीनीखाली गेलेले धुलीकण, हवेच्या बुडबूड्यांचा समावेश आहे. या सर्व घटकांच्या नमुण्यावरुन शास्त्रज्ञांना तेव्हा पासून आतापर्यंत झालेले हवामानातील बदल शोधता येऊ शकतात. बर्फाच्या प्रत्येक थरामध्ये एक वेगळे रहस्य दडलेले आहे.

  100,000 वर्षांनी बदलते पृथ्वीवरील हवामान

  यापूर्वी, इटलीच्या एका विद्यापीठातील रसायणशास्त्राचे तज्ञ कार्लो बार्बांटे हे देखील अशाच जुन्या बर्फाच्या शोधात होते. त्यांनी युरोपियन कमिशनला असे सांगितले होते की, मागच्या काही दशलक्ष वर्षांमध्ये पृथ्वीचे हवामान वेगवेगळ्या कालावधीत थंड आणि उष्णतेमध्ये बदलले आहे. सागराच्या खोल भागातून मिळालेल्या गाळ सदृश्य घटकावर झालेल्या संशोधनातून दर 41,000 वर्षांनी पृथ्वीवर हवामान बदलते. त्यानुसार हवामान थंड आणि उष्ण होत असते. नंतर सुमारे दहा लाख वर्षांनी हे चक्र बदलले आणि त्याचा कालावधी 41,000 वर्षांवरुन थेट 100,000 वर्षांवर गेला असे बार्बांटे यांनी सांगितले. सेंटर फॉर ओल्डेस्ट आइस एक्सप्लोरेशन कोल्ड एक्सची घोषणा करताना अमेरिकन शास्त्रज्ञांनी या संशोधनासाठी 25 दशलक्ष डॉलर अनुदान मिळाले असल्याचे समोर आले आहे. इतिहासातील संशोधनाची ही मोहीम युरोपियन प्रोजेक्ट फॉर आईस कोरिंग इन अंटार्क्टिका ईपीआयसीए या संस्थेकडून राबविली जाणार आहे.

  एक मंत्री कोण? ते सांगा. असा हवेत गोळीबार करून चालणार नाही. तसेच कोणी कुणाच्या थोबाडीत मारत नाही. चंद्रकांत पाटील किंवा इतर कुणी अशा अफवा पसरवत असतात. यातून त्यांना आनंद मिळतो. म्हणून त्यांनी त्याचा आनंद घ्यावा. मात्र महाविकास आघाडीचे सरकार तीन वर्षे चालणार आहे. त्यानंतर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल. याविषयीदेखील त्यांनी निश्चिंत राहावे.

  - संजय राऊत, खासदार, शिवसेना