गरजा पूर्ण करण्यासाठी सोने गहाण ठेवण्याकडे कल; सोनं तारण ठेवण्यात 86% वाढ

कोरोना महामारीमुळे देशात मोठ्या प्रमाणात पैशांची चणचण जाणवू लागली आहे. यामुळे मध्यमवर्गाचा कणाच मोडला आहे, तर मजूर व कामागारांसमोर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत उभी राहिली आहे. मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर महामारीदरम्यान घरातील सोने गहाण ठेवून आपल्या आवश्यकता पूर्ण करीत आहे. एवढेच नव्हे तर शेजारी, नातेवाईक यांच्याकडून उधार घेऊन किंवा क्रेडिट कार्डावरील कर्ज काढून दैनंदिन आवश्यकता पूर्ण करण्यास विवश आहे. आयबीआयची आकडेवारी सांगते की, यावर्षी एप्रिल महिन्यात वैयक्तिक कर्ज प्रकरणात 12.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या कर्जात 17%ने वाढ झाली आहे. सर्वांत जास्त वाढ सोने गहाण ठेवून कर्ज काढण्यात झाली असून याचे प्रमाण 86% झाले आहे.

  दिल्ली : कोरोना महामारीमुळे देशात मोठ्या प्रमाणात पैशांची चणचण जाणवू लागली आहे. यामुळे मध्यमवर्गाचा कणाच मोडला आहे, तर मजूर व कामागारांसमोर दोन वेळच्या जेवणाची भ्रांत उभी राहिली आहे. मध्यमवर्ग मोठ्या प्रमाणावर महामारीदरम्यान घरातील सोने गहाण ठेवून आपल्या आवश्यकता पूर्ण करीत आहे. एवढेच नव्हे तर शेजारी, नातेवाईक यांच्याकडून उधार घेऊन किंवा क्रेडिट कार्डावरील कर्ज काढून दैनंदिन आवश्यकता पूर्ण करण्यास विवश आहे. आयबीआयची आकडेवारी सांगते की, यावर्षी एप्रिल महिन्यात वैयक्तिक कर्ज प्रकरणात 12.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. क्रेडिट कार्डच्या कर्जात 17%ने वाढ झाली आहे. सर्वांत जास्त वाढ सोने गहाण ठेवून कर्ज काढण्यात झाली असून याचे प्रमाण 86% झाले आहे.

  कर्ज फेडण्यात अडचण

  कोरोनाच्या पहिल्या लाटेत सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग, किरकोळ व्यापारी, रिक्षा, ऑटो व टॅक्सी चालविणारे व निर्माण क्षेत्रातील मजुरांना जेवणाची काळजी पडली होती. अर्थव्यवस्थेचा दर गेल्या वर्षी शून्यापेक्षाही खाली गेले होते, परंतु दुसऱ्या लाटेने लोकांना फुटपाथवर आणून उभे केले आहे. खास म्हणजे मध्यमवर्गी कुटुंबातही भूकबळीची वेळ आली आहे. घर व वाहनकर्ज फेडण्यात अडचण येत आहे. कोरोनाच्या दोन्ही लाटेत लॉकडाऊन व कर्फ्यू यामुळे लोकांच्या पोटापाण्याच्या साधनांना व उत्पन्नाला मोठा फटका बसला आहे. आरबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे की, लेाकांनी अनौपचारिक सेक्टर म्हणजेच नातेवाईक, शेजारी व अधिक व्याजदरावर कर्ज देणाऱ्या सावकारांकडूनही उधार घेतले आहे.

  अशी आहे आकडेवारी

  बँकांकडून वैयक्तिक व क्रेडिट कार्डशिवाय सर्वाधिक पैसा लोकांनी सोने गहाण ठेवून कर्जाद्वारे घेतला आहे, असा रेकॉर्ड आहे. मार्चपर्यंत बँकांनी दागिन्यांवर जे कर्ज घेतले आहे, त्यात 82% वाढ झाली आहे. हे कर्ज 60464 कोटी होते. एप्रिल महिन्यात हा आकडा 62238 कोटी रुपयांवर गेला आहे. गेल्यावर्षी अशा प्रकारचे 33303 कर्ज बँकांनी दिले होते. आरबीआयनुसार, आता फक्त पहिल्या लाटेतील आकडे उपलब्ध आहे. रिपोर्टनुसार, कुटुंबांचे कर्ज जुलै, सप्टेंबर 2020-21च्या तिमाहीत जीडीपीच्या 37.1 टक्क्यांएवढे होते. या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिसऱ्या तिमाहीत हे प्रमाण 35.4 एवढे होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबांच्या कर्जासंबंधी आकडेवारी पुढील तिमाहीत उपलब्ध होईल. वैयक्तिक कर्जासंबंधी आकड्यात सांगण्यात आले आहे की, दुसऱ्या लाटेदरम्यान ग्राहक वस्तूंवर पहिल्या लाटेदरम्यान जसा खर्च करीत होते, ते करताना आढळत नाही. लोकांना दैनंदिन आवश्यकतांसाठी सोने गहाण ठेवून उधार घ्यावे लागत आहे. आवश्यक खाद्यवस्तू सोडून अन्य आवश्यक वस्तूंची खरेदी लोक करू शकत नाही.

  हे सुद्धा वाचा