कोरोनाची तिसरी लाट; सामना करण्यासाठी संघ स्वयंसेवकांना देणार खास ट्रेनिंग

स्वयंसेवक संघाच्या एकूण 27 हजार 166 शाखा पुन्हा एकदा मैदानात उतरून नागरिकांची सेवा करणार असल्याचे स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात आले आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत संघटनात्मक कामांबाबत चर्चा झाली. यासोबतच कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर व्यापक रूपात चर्चा केली गेली. याशिवाय संघाच्या माध्यमातून विविध ठिकाणी केल्या गेल्या कामांचा आढवा बैठकीत घेण्यात आला. स्वयंसेवकांच्या पुढाकारातून कोरोना लसीकरण केंद्रांचीही माहिती यावेळी घेण्यात आली.

    दिल्ली : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी संघाकडून देशव्यापी ‘कार्यकर्ता प्रशिक्षण’ शिबिराचे आयोजन केले जाणार आहे. यात प्रशिक्षण घेतलेले स्वयंसेवक देशातील एकूण अडीच लाख जागांवर पोहोचून कोरोना संबंधिची जनजागृती करण्याचे काम करणार आहेत.

    स्वयंसेवक संघाच्या एकूण 27 हजार 166 शाखा पुन्हा एकदा मैदानात उतरून नागरिकांची सेवा करणार असल्याचे स्वयंसेवक संघाकडून सांगण्यात आले आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रांत प्रचारक बैठकीत संघटनात्मक कामांबाबत चर्चा झाली. यासोबतच कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर व्यापक रूपात चर्चा केली गेली. याशिवाय संघाच्या माध्यमातून विविध ठिकाणी केल्या गेल्या कामांचा आढवा बैठकीत घेण्यात आला. स्वयंसेवकांच्या पुढाकारातून कोरोना लसीकरण केंद्रांचीही माहिती यावेळी घेण्यात आली.

    कोरोना प्रादुर्भावाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता संपूर्ण देशात सरकार आणि प्रशासनाची मदत करण्यासाठी तसेच पीडित नागरिकांना मदत करण्यासाठी स्वयंसेवक संघातील सेवकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. कोरोनासारख्या कठीण काळात समाजाचं मनोबल वाढविण्यासाठी आवश्यक असणारी सर्व सुयोग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशिक्षित स्वयंसेवक देशभरात एकूण अडीच लाख ठिकाणांवर पोहोचणार आहेत. स्वयंसेवकांचे प्रशिक्षण ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे आणि सप्टेंबर महिन्यापासून जनजागृती मोहिमेला सुरुवात होार आहे. यात प्रत्येक गाव आणि नाक्या नाक्यावर जाऊन स्वयंसेवी नागरिक व संस्थांना देखील सोबत घेतले जाणार आहे.