The thrilling experience of death The husband grabbed the wife's hand as she jumped from the ninth floor; Finally the hand escaped and ...

मृत्यूचा थरारक अनुभव उत्तर प्रदेशातील एका विवाहीत महिले घेतला आहे. पती सोबत भांडण झाल्यानंतर या महिलेने गॅलेरीतून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी गॅलेरीतून उडी घेणाऱ्या या महिलेचा हात तिच्या पतीने पकडला. पण शेवटी हात सुटला आणि महिला खाली पडली. उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमधील (Ghaziabad) क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातील एका पॉश आणि प्रसिद्ध सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. सोसायटीमधील नागरीकांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव वाचला आहे.

    नवी दिल्ली : मृत्यूचा थरारक अनुभव उत्तर प्रदेशातील एका विवाहीत महिले घेतला आहे. पती सोबत भांडण झाल्यानंतर या महिलेने गॅलेरीतून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी गॅलेरीतून उडी घेणाऱ्या या महिलेचा हात तिच्या पतीने पकडला. पण शेवटी हात सुटला आणि महिला खाली पडली.
    उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) गाझियाबादमधील (Ghaziabad) क्रॉसिंग रिपब्लिक परिसरातील एका पॉश आणि प्रसिद्ध सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. सोसायटीमधील नागरीकांच्या सतर्कतेमुळे या महिलेचा जीव वाचला आहे.

    या महिलेचा आपल्या पतीसह भाडण झाले. भांडता भांडता या महिलेल्या नवव्या मजल्यावरील गॅलरीतून उडी घेतली. यावेळी तिच्या पतीने पटकन तिचा हात पकडत तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. ही महिला गॅलरीत पतीच्या हाताला लटकून होती. बराच वेळ तो तिला वर खेचण्याचा प्रयत्न करत होता. हा प्रकार पाहून सोसायटीतील इतर सदस्य त्यांच्या मदतीला धावून आले.

    सोसयटीमधील नागरीकांनी महिला लटकत असलेल्या जागेवर खाली गादी अंथरली. अखेरीस पतीचा हात सुटला आणि ही महिला खाली पडली. मात्र, आधीच जमीनीवर गादी अंथरल्यामुळे ही महिला अलगद या गादीवर पडल्याने तिला कोणतीही दुखापत झाली नाही. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओदेखील (Live Video)व्हायरल झाला आहे.