कोरोनामुक्तीनंतर तीन महिन्यांनी देणार लस; लहान मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांना देखील आता लस देण्यास मंजूरी

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना तीन महिन्यानंतर प्रतिबंधक लस देण्यास आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन एडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 ने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यावरुन प्रस्ताव दिला होता. नव्या नियमानुसार, कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनातून बरे झाल्यावर तीन महिन्यांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.

    दिल्ली : कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना तीन महिन्यानंतर प्रतिबंधक लस देण्यास आरोग्य मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सिन एडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 ने कोरोना प्रतिबंधक लस घेण्यावरुन प्रस्ताव दिला होता. नव्या नियमानुसार, कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर ज्या रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना कोरोनातून बरे झाल्यावर तीन महिन्यांनंतर लसीचा दुसरा डोस दिला जाईल.

    तर, लहान मुलांना स्तनपान करणाऱ्या महिलांना देखील आता लस देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कोरोनाने संक्रमित रुग्ण ज्यांना उपचारादरम्यान प्लाझ्मा थेरपी देण्यात आली होती. ते रुग्ण देखील तीन महिन्यांनंतर कोरोना प्रतिबंधक लस घेऊ शकतात.

    दरम्यान, इतर कोणत्याही गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना लस घेण्यासाठी चार ते आठ आठवड्यांची वाट पाहावी लागेल. नव्या नियमानुसार, कोणतीही व्यक्ती लस घेतल्यावर 14 दिवसांनंतर रक्तदान करू शकते.