कोरोनाच्या संभाव्य लाटेबाबत WHO म्हणतेय की ….

भारतातील लोकसंख्येची विविधता आणि देशाच्या विविध भागांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची स्थिती पाहता, कोरोना संसर्गाची परिस्थिती अशीच सुरू राहणे खूप शक्य आहे.

    नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा वैद्यकीय तज्ज्ञाकडून देण्यात आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेही कोरोनाच्या स्थितीवर भाष्य केलं आहे. डब्लूएचओच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन (Dr. Soumya Swaminathan) भारतात कोविड-१९ भारतात काही प्रकारच्या स्थानिक स्थितीत (Stage of endemicity) प्रवेश करत आहे. पुढे स्वामीनाथन म्हणाल्या की, जिथे व्हायरसचा प्रसार कमी किंवा मध्यम पातळीवर आहे. प्रत्यक्षात स्थानिक पातळीचा टप्पा उद्भवतो तेव्हा देशाची लोकसंख्या व्हायरससह जगणं शिकून जाते.

    कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा हा टप्पा खूप वेगळा आहे. कोव्हॅक्सिनला मंजुरी देताना शास्त्रज्ञ म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की WHOचा टेक्निकल ग्रुप कोव्हॅक्सिनला त्याच्या अधिकृत लसींपैकी एक म्हणून मान्यता देण्यास समाधानी असेल आणि सप्टेंबरच्या मध्यापर्यंत हे होण्याची शक्यता आहे. सौम्या स्वामीनाथन पुढे म्हणाल्या की, भारतातील लोकसंख्येची विविधता आणि देशाच्या विविध भागांमध्ये रोग प्रतिकारशक्तीची स्थिती पाहता, कोरोना संसर्गाची परिस्थिती अशीच सुरू राहणे खूप शक्य आहे. तसंच देशाच्या विविध भागांमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत चढ -उतार होऊ शकतो.