पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाची पत्नी झाली लेफ्टनंट

येत्या २९ मे ला लष्कराचा गणवेश घालून निकिता लेफ्टनंट पदावर रुजू होतील. शनिवारी लेफ्टनंट म्हणून निकिता देशाच्या सेवेत रुजू होतील अशी माहिती लेफ्टनंट कर्नल विकास नौटियाल यांनी दिली आहे. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी देहरादून येथील रहिवासी मेजर विभूती धौंडियाल काश्मिरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांचा सामना करत शहीद झाले होते.

    नवी दिल्ली: पुलवामा येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले. यांनतर मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी निकिता धौंडियाल यांनी त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत लष्करात जाण्याचाही निर्णय घेतला. त्यानुसार गेल्या वर्षी निकिता यांनी Short Service Commission ची परीक्षा उत्तीर्ण केली होती.त्यानंतर चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

    येत्या २९ मे ला लष्कराचा गणवेश घालून निकिता लेफ्टनंट पदावर रुजू होतील. शनिवारी लेफ्टनंट म्हणून निकिता देशाच्या सेवेत रुजू होतील अशी माहिती लेफ्टनंट कर्नल विकास नौटियाल यांनी दिली आहे. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी देहरादून येथील रहिवासी मेजर विभूती धौंडियाल काश्मिरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांचा सामना करत शहीद झाले होते. लग्नानंतर अवघ्या ९ महिन्याटाच पतीच्या निधनाचे दुःख पचवत त्यांनी लष्करात जाण्याचा निर्णय घेतला.