संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे ; ९ देशांनी केली कोरोना लशीची मागणी

ब्राझील, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांनी भारताकडे करोनाच्या लसीची मागणी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत इतर देशांना करोनाच्या लसीचा पुरवठा करताना शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देणार आहे. त्यामुळेच बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना भारत आधी लसींचा पुरवठा करणार असल्याचे वृत्त आहे. भारतीय लसींचा दर्जा, गुणवत्ता आणि परिणामकारकता पाहता जगभरातून या लसींना मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

दिल्ली : भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लशींना आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. यानंतर संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले आहे. जगातील अनेक देशांनी भारताकडे या संपूर्णपणे स्वदेशी बनावटीच्या लसीची मागणी केली आहे.

ब्राझील, मोरक्को, सौदी अरेबिया, म्यानमार, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका सारख्या देशांनी भारताकडे करोनाच्या लसीची मागणी केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत इतर देशांना करोनाच्या लसीचा पुरवठा करताना शेजारी देशांना प्रथम प्राधान्य देणार आहे. त्यामुळेच बांगलादेश, भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि अफगाणिस्तानसारख्या देशांना भारत आधी लसींचा पुरवठा करणार असल्याचे वृत्त आहे. भारतीय लसींचा दर्जा, गुणवत्ता आणि परिणामकारकता पाहता जगभरातून या लसींना मागणी वाढल्याचे चित्र दिसत आहे.

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून भारताने अ‍ॅस्ट्रॉझेनेकाच्या लशीचा तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. मात्र, भारताने करोनासंदर्भातील जे धोरण तयार केलं आहे त्यानुसार सर्वात आधी भारत आपल्या शेजरच्या देशांना करोनाची लस देणार आहे. त्यानंतर जगभरातील इतर देशांमध्ये करोनाची लस पाठवली जाणार आहे.

डीसीजीआयने ३ जानेवारी रोजी भारतात लसींना मंजुरी दिली होती. त्यामुळे आता १३ ते १४ जानेवारीपर्यंत प्रत्यक्ष लसीकरणास देशात सुरूवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्या टप्प्यात भारत बायोटेक आणि सीरम इन्स्टिट्यूटची लस दिली जाणार आहे. देशात सध्या सर्वत्र कोरोना लसीकरणाची ड्राय रन घेतली जात आहे. यानंतर आता प्रत्यक्षात लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे.