१८० जिल्ह्यांमध्ये एकही कोरोना रुग्ण नाही; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना संकटादरम्यान एक दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या सात दिवसांपासून देशातील १८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या १४ दिवसांमध्ये १८ जिल्ह्यांत तर गेल्या २१ दिवसांमध्ये ५४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

    दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना संकटादरम्यान एक दिलासादायक माहिती दिली आहे. गेल्या सात दिवसांपासून देशातील १८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. गेल्या १४ दिवसांमध्ये १८ जिल्ह्यांत तर गेल्या २१ दिवसांमध्ये ५४ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

    संपूर्ण देशात कोरोनाचा कहर माजला आहे. या घातक विषाणूमुळे देशातील अनेक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. प्रत्येक दिवशी कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. हर्षवर्धन बोलत होते. राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना आवश्यक ती आरोग्यविषयक मदत दिली जात आहे.

    परदेशातून आलेली मदत राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशापर्यंत पोहोचवली जात आहे. यामध्ये आता २९३३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, २४२९ ऑक्सिजन सिलिंडर, १३ ऑक्सिजन उत्पादन संयंत्र, २९५१ व्हेंटिलेटर/ बीआय पीएपी/ सी पीएपी आणि तीन लाखाहून अधिक रेमडेसिव्हीर इंजेक्शन वितरित केले गेले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.