डॉ. शेखर मांडे
 डॉ. शेखर मांडे

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर) चे प्रमुख डॉ शेखर मांडे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची गरज नाही असे माध्यमांशी चर्चा करताना स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात  मुंबई, अकोला, अमरावती, वर्धा येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र यासाठी तातडीने लॉकडाऊनची आवश्यकता नाही.

    दिल्ली (Delhi).  राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (सीएसआयआर) चे प्रमुख डॉ शेखर मांडे यांनी महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याची गरज नाही असे माध्यमांशी चर्चा करताना स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात  मुंबई, अकोला, अमरावती, वर्धा येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. मात्र यासाठी तातडीने लॉकडाऊनची आवश्यकता नाही. मुंबईत लोकल बंद करण्याची गरज नाही. मात्र कोरोनाचे संकट अद्यापही कायम असल्याने आवश्यक खबरदारी लोकांना घ्यावीच लागणार आहे. त्यासाठी सातत्याने चाचण्या वाढविणे, कोरोनाचे रूग्ण असतीला त्या वस्त्यामध्ये आयसोलेशन करणे या सारखे पर्यायी मार्ग आहेत, असे ते म्हणाले.

    टाळेबंदी हा अंतिम पर्याय
    माध्यमांशी चर्चा करताना डॉ मांडे म्हणाले की, महाराष्ट्राच्या ठराविक भागात कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गर्दीची ठिकाणे लोकांनी टाळावी. लोकांमध्ये  सध्या कोरोनाबाबत निष्काळजीपणाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे त्यांना सजग करण्याची गरज आहे. या पूर्वीच्या काळात सरकारने टाळेबंदीसारखा निर्णय घेतला कारण तयारी करण्यासाठी वेळ नव्हता. मात्र आता सरकारने या बाबत पुरेशी तयारी केली आहे. त्यामुळे टाळेबंदी हा अंतिम पर्याय असला तरी लोकांनी मास्क वापरणे, हात धुणे, अंतर राखणे इत्यादी उपाय योजना काटेकोरपणाने केल्या पाहीजेत. टाळेबंदी पेक्षा प्रभावीत क्षेत्रात ट्रेसिंग आणि आयसोलेशन करण्याची गरज आहे असे ते म्हणाले.