लॉकडाऊनशिवाय पर्यायच नाही; राहुल गांधींची मागणी

भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याबाबतीच चर्चा सुरू आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे देशात लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.

  दिल्ली : भारतात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लावण्याबाबतीच चर्चा सुरू आहेत. यातच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन करण्याशिवाय पर्यायच नाही, असे म्हटले आहे. राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे देशात लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे.

  केंद्र सरकारच्या ढिसाळ कामगिरीमुळे देशात कोरोना वाढला. सरकारच्या निष्क्रियतेमुळेच अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. आता देशातील कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर संपूर्ण लॉकडाऊन केल्याशिवा दुसरा पर्याय नाही असे राहुल गांधीनी म्हंटले आहे.

  रघुराम राजन यांचे टीकास्त्र

  कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण आरोग्य यंत्रणांचे पितळ उघडे पडले असून ऑक्सिजनची कमतरता आणि अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे रुग्णांचे हाल होत आहेत. कोरोनामुळे भारतात विदारक स्थिती निर्माण झाली असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त करतानाच या संपूर्ण स्थितीसाठी केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याची अप्रत्यक्षरित्या टीका केली.

  गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सर्व शांत बसले होते. जगात काय सुरू आहे यावर लक्ष केंद्रीत केले असते तर बरे झाले असते. ब्राझीलचे उदाहरण समोर होते. कोरोना अधिक प्रभावीपणे पुन्हा येत आहे. मात्र नेतृत्वाचा अभाव आणि दूरदृष्टी नसल्याने ही स्थिती ओढावली असल्याचे राजन म्हणाले.

  कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर भारताने लोकसंख्येच्या तुलनेत व्हॅक्सिन तयार केल्या नाहीत. त्यांना वाटले अजून आपल्याकडे खूप वेळ आहे. आपण कोरोनाला हरवले आहे. लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू करू शकतो, या विचारामुळेच कोरोना वाढल्याचे राजन म्हणाले.

  सांगली, कोल्हापूर ८ दिवसांसाठी ‘लॉक’

  कोरोना संसर्गाचा कहर वाढल्याने सांगलीत ८ दिवसांचा तर कोल्हापुरात १० दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. सांगलीत ५ मे रोजी मध्यरात्रीपासून हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तशी घोषणाच केली. सर्वांचा जीव वाचणं महत्त्वाचा आहे. त्यासाठीच हा लॉकडाऊन करण्यात येत असल्याचं भावनिक आवाहनही त्यांनी केले. दुसरीकडे, कोल्हापुरातही १० दिवसांचा १५ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याबाबत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.