उत्तर भारतात मागील दोन आठवड्यांपासून पावसाचा पत्ता कट, राजधानी दिल्लीत गर्मीचं तापमान वाढलं ; ९० वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक

३ जुलै रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढील दोन दिवसांसाठी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्व दिशेकडून येणाऱ्या हवेला पश्चिम दिशेकडील हवा रोखून ठेवते. त्यामुळे दिल्लीला मान्सूनसाठी खूप वाट पहावी लागत आहे. 

    पावसाळी हंगामाला सुरूवात झाली असली तरी मागील दोन आठवड्यांपासून उत्तर भारतात पाऊस गायब झाल्यासारखं दिसत आहे. पाऊस पडत नसल्यामुळे राजधानी दिल्लीत गर्मीचं तापमान मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. जणू मागील ९० वर्षांचा रेकॉर्डच ब्रेक केलाा आहे. पाकिस्तानमधून येणाऱ्या वाऱ्यामुळे राजधानी दिल्लीत गर्मीचं आगमन झालं आहे. उत्तर भारतात गर्मीचा पारा ७ डिग्रीच्या वर गेला आहे.

    राजधानीमधील मंगेशपूर विभागात गुरूवारी तापमान ४५.२ डिग्री इतकं होतं. १ जुलै १९३१ मध्ये तापमानाचा पारा हा ४५ डिग्री पर्यंत होता. परंतु जुलैचा पहिला दिवस ९ वर्षांनंतर गर्म होता. तर २०१२ मध्ये ४३.५ डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होतं. मागील दोन वर्षांत दिल्लीमध्ये हवेचं आणि गर्मीचं तापमान ४३ डिग्री सेल्सिअसच्या जवळपास होतं. परंतु सामान्य रूपात पाहिलं असता तो ७ डिग्रीपेक्षा अधिक आहे.

    ३ जुलै रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून पुढील दोन दिवसांसाठी पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पूर्व दिशेकडून येणाऱ्या हवेला पश्चिम दिशेकडील हवा रोखून ठेवते. त्यामुळे दिल्लीला मान्सूनसाठी खूप वाट पहावी लागत आहे.

    दिल्लीसोबतच हरियाणा, पंजाब, चंडीगड आणि पश्चिमी यूपी विभागात मागील तीन दिवसांपासून मान्सूनची एन्ट्री सुद्धा झालेली नाहीये. दरम्यान, पाकिस्तानमधून वाहणाऱ्या हवेमुळे पश्चिम उत्तर प्रदेशातील मान्सूनच्या हवेला मागील दोन आठवड्यांपासून रोखत असल्याचे दिसत आहे.