रोज 5 लाख कोरोनाबाधितांची संख्या होईल;  महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेशमध्ये एप्रिल अखेरीस रुग्णसंख्या सर्वोच्च शिखर गाठेल

मे महिन्याच्या पंधरवड्यात जेव्हा कोरोनाबाधितांची संख्या सर्वोच्च शिखरावर असेल तेव्हा, सर्व देशातील राज्यांना कोरोनाचा विळखा घातलेला असेल. त्यातही उत्तर प्रदेशसारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांची स्थिती गंभीर होईल, अशी भीती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीत निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशमध्ये व्यक्त करण्यात आली.

  दिल्ली : मे महिन्याच्या पंधरवड्यात जेव्हा कोरोनाबाधितांची संख्या सर्वोच्च शिखरावर असेल तेव्हा, सर्व देशातील राज्यांना कोरोनाचा विळखा घातलेला असेल. त्यातही उत्तर प्रदेशसारख्या मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांची स्थिती गंभीर होईल, अशी भीती पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकीत निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सादर केलेल्या प्रेझेंटेशमध्ये व्यक्त करण्यात आली.

  पॉल यांनी आयआयटी कानपूरने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार एक प्रेझेंटेशन सादर केले होते. मे महिन्याच्या पंधरवड्यात रुग्णसंख्या रोज 5 लाख अथवा त्यापेक्षाही जास्त असू शकते. त्यानंतर मात्र बाधितांच्या संख्येत घट होईल, यासोबतच राज्यांच्या आरोग्य व्यवस्था अशा संकटाचा सामना करण्यास असमर्थ ठरतील असे सांगून ते म्हणाले, सर्वात वाईट स्थिती सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांची असेल.

  भारत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरही विजय मिळविले असे मत व्यक्त करतानाच जे अंदाज वर्तविण्यात आले ते सुखद नसल्याचेही सांगून ते म्हणतात, यात ज्या 10 राज्यांमध्ये कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे त्या राज्यात आरोग्य व्यवस्थेतील त्रुटीवर बोटही ठेवण्यात आले आहे. या 10 राज्यांमध्ये महाराष्ट्र, दिल्ली, उत्तरप्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, मध्यप्रदेश, राजस्थान आणि गुजरातचा समावेश आहे. त्यापैकी उत्तरप्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्लीत एप्रिल अखेरीस रुग्णसंख्या सर्वोच्च शिखर गाठेल असे मत व्यक्त करण्यात आले आहे.

  बाधितांच्या संख्येत होणारी वाढ आरोग्य सुविधांची कमतरता प्रदर्शित करणारी आहे. संकटाचा सामना करण्यासाठी रणनीतीत बदल करण्यास विलंब झाला तर स्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता. औषधी, ऑक्सिजनचा तुटवडा यामुळे जगात भारताच बाधितांच्या संख्येत सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे.

  देशात कोरोनाविरुद्धच्या लसीकरण अभियानास रविवारी 100 दिवस पूर्ण झाले. दोन्ही डोस घेतलेल्या लोकांची संख्या सध्या 2.18 कोटी आहे. देशातील 10% लोकसंख्येला किमान एक डोस मिळालेला असेल. निरीक्षणानुसार दोन्ही डोस घेतल्यानंतर ज्या लोकांना संसर्ग झाला त्यांना रुग्णालयात भरती करण्याची गरज पडली नाही. म्हणजे एक डोस रुग्णाला गंभीर आजारापासून वाचवत आहे.

  दुसरा डोस सुरक्षा कवच ठरत आहे. डब्ल्यूएचओनुसार, कोणत्याही भागात राहणाऱ्या 70% लोकसंख्येला लस दिली गेली तर तेथे संसर्गाची नवी लाट येणार नाही. म्हणजेच 70% लोकसंख्येला हा डोस दिला जाईल तेव्हाच कोरोनाचा कायम नायनाट होईल अशी अपेक्षा व्यक्त होते. देशात दर महिन्याला 8 कोटी डोस तयार होत आहेत. हे सर्व डोस दर महिन्याला देशातच वापरले तर 70%लोकसंख्येसाठी लागतील 182 कोटी डोस. 13.84कोटी डाेस दिले गेले आहेत. उर्वरित 168 कोटी डोस एक वर्षात दिले जातील. म्हणजे एप्रिल 2022 पर्यंत भारत हे लक्ष्य गाठू शकतो. केंद्राचा असा दावा आहे की, जूननंतर देशात मासिक 12 कोटी डोस उत्पादन क्षमता होईल.