EPF च्या नियमांमध्ये होणार मोठा बदल, जाणून घ्या काय आहे?

PF Accounts दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील. सीबीडीटीच्या अधिसूचनेनुसार, 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही योगदानावर कोणताही कर भरावा लागणार नाही, परंतु 2020-21 आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल, ज्याची स्वतंत्र गणना केली जाणार आहे.

    नवी दिल्ली:  कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या (EPF) नियमांमध्ये मोठा बदल झाला आहे. जर एखाद्या व्यक्तीने ईपीएफमध्ये एका आर्थिक वर्षात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त योगदान दिले असेल, तर त्याला 2021-22 या आर्थिक वर्षापासून दोन स्वतंत्र पीएफ खाती ठेवावी लागतील. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यासंदर्भात अधिसूचनाही जारी केली आहे.

    अधिसूचनेनुसार, PF Accounts दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जातील. सीबीडीटीच्या अधिसूचनेनुसार, 31 मार्च 2021 पर्यंत कोणत्याही योगदानावर कोणताही कर भरावा लागणार नाही, परंतु 2020-21 आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल, ज्याची स्वतंत्र गणना केली जाणार आहे.

    हे नियम 1 एप्रिल 2022 पासून लागू होतील. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये जर तुमच्या पीएफ खात्यात 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली असेल, तर तुम्हाला त्या अतिरिक्त रकमेवर मिळालेल्या व्याजावर कर भरावा लागेल. अशी माहिती CBDT मते व्यक्त करण्यात आली आहे.