कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी किती असेल घातक ?; एम्सच्या संचालकानं दिली माहिती

भारतातील अथवा जगभरातील आकडेवारीतून बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं दिसून आलेलं नाही. दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या बालकांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली तसेच काही बाधित बालकांना इतर आजार असल्याचं दिसलं. यापुढेही बालकांमध्ये कोरोनाचा गंभीर संसर्ग आढळून येईल असं मला वाटत नाही, असा विश्वास गुलेरिया यांनी व्यक्त केला.

    नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. अशातच एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक ठरेल का? याबाबत वक्तव्य केलं आहे.

    भारतातील अथवा जगभरातील आकडेवारीतून बालकांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग अधिक असल्याचं दिसून आलेलं नाही. दुसऱ्या लाटेत बाधित झालेल्या बालकांमध्ये सौम्य लक्षणं आढळून आली तसेच काही बाधित बालकांना इतर आजार असल्याचं दिसलं. यापुढेही बालकांमध्ये कोरोनाचा गंभीर संसर्ग आढळून येईल असं मला वाटत नाही, असा विश्वास गुलेरिया यांनी व्यक्त केला.

    जोवर अधिकांश लोकांचे लसीकरण होत नाही, तोवर आपल्याला सतर्कता बाळगावी लागेल. सध्या कुठल्याही देशात असा कुठलाही डेटा आलेला नाही, ज्यावरून मुलांना अधिक धोका आहे, असं सांगितं जाऊ शकेल, असंही गुलेरिया यांनी सांगितलं.