डेल्टा व्हेरियंटचे कारण देत ‘या’ देशाने हवाई प्रवासावरील बंदीची मुदत ‘एवढ्या’ महिन्यांनी वाढवली

देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारली तर कॅनडामध्ये प्रवेश करण्यापूर्वी कमीतकमी १४ दिवस आधी कॅनडाने मंजूर केलेल्या कोणत्याही लसीचे डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी ७ सप्टेंबरपासून आपली सीमा उघडतील.

    नवी दिल्ली: देशातील कोरोनाची दुसरी लाटा संपलेली असताना दुसरीकडे कोरोना डेल्टा व्हेरियंटचे संक्रमण वाढ आहे. या नव्या संकटाचा धोका लक्षात घेता कॅनडा सरकारने भारतीय फ्लाईट्सवरील बंदीची मुदत ३० दिवसांनी वाढवली आहे. कॅनडा सरकारने घातलेली मुदत उद्या २१ जुलैला संपणार होती, तत्पूर्वीच हवाई प्रवासाच्या नव्या बंदीच्या मुदत वाढीची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय फ्लाईट्सवर घातलेल्या बंदीच्या मुदतीत चौथ्यांदा वाढ करण्यात आली आहे. याबाबत माहिती कॅनडा सरकारने दिली असून एएनआय वृत्तसंस्थेने ट्वीट केले आहे.

    ‘सार्वजनिक आरोग्याच्या सल्ल्यानुसार भारतीय फ्लाईट्सवरील बंदीची मुदतवाढ केली आहे. तसेच कॅनडाने थेट मार्गाने भारतातून कॅनडाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासापूर्वी कोरोना चाचणी संबंधित आवश्यकता वाढवली आहे. तसेच कॅनडातून भारतात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासापूर्वी कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. कॅनडा सरकारकडून देशातील प्रवासावरील निर्बंध कमी करण्यासाठी उपाययोजना जाहीर केल्यानंतर ही घोषणा करण्यात आल्याची माहिती कॅनडाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

    देशातील कोरोनाची परिस्थिती सुधारली तर कॅनडामध्ये प्रवेश करण्यापूर्वी कमीतकमी १४ दिवस आधी कॅनडाने मंजूर केलेल्या कोणत्याही लसीचे डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी ७ सप्टेंबरपासून आपली सीमा उघडतील. दरम्यान कोरोना लस घेतलेल्या अमेरिकन नागरिकांना ९ ऑगस्टपासून कॅनडामध्ये प्रवेश मिळणार आहे.