कोरोनाची दुसरी लाट पसरण्यामागे ‘हे’ आहे खरं कारण.., ICMR ने सांगितलं असं काही…

दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पसरलेल्या संक्रमणाला प्रवासी मजूर (Migrant Labour) आणि धार्मिक कार्यक्रमांतील (Religious Gathering ) गर्दी कारणीभूत होती. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या काळात घेतलेल्या सँपल्समध्ये SARS-CoV-2 विषाणूच्या व्हेरियंट्समध्ये स्वतंत्र अमिनो असिड म्युटेशन्स सापडली होती. आताच्या विषाणूच्या परिस्थितीला हे म्युटेशनच कारणीभूत ठरल्याचं आता दिसून येतंय.

    नवी दिल्ली: कोणत्याही रोगाचं संक्रमण कसं पसरतं याचा अभ्यास करणं अत्यंत महत्त्वाचं असतं कारण जर आपण प्रसाराचं कारण ओळखलं आणि त्याला पायबंद घातला तर आपल्याला आजारावर नियंत्रण ठेवणं सोपं पडतं. त्यामुळे मेडिकल क्षेत्रात (Medical) अनेक सर्व्हे केले जातात आणि त्याचे अहवाल सार्वजनिक केले जातात. असाच आयसीएमआरचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे.

    दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पसरलेल्या संक्रमणाला प्रवासी मजूर (Migrant Labour) आणि धार्मिक कार्यक्रमांतील (Religious Gathering ) गर्दी कारणीभूत होती. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या काळात घेतलेल्या सँपल्समध्ये SARS-CoV-2 विषाणूच्या व्हेरियंट्समध्ये स्वतंत्र अमिनो असिड म्युटेशन्स सापडली होती. आताच्या विषाणूच्या परिस्थितीला हे म्युटेशनच कारणीभूत ठरल्याचं आता दिसून येतंय.

    भारतात B.1.1.7 लिनिएज, व्हेरियंट ऑफ कन्सर्न (variant of concern VOC) आणि B.1.351 लिनिएज हे कोरोना विषाणूचे तीन व्हेरियंट सापडले. या व्हेरियंटमुळे अँटिजेनिक ड्रिफ्ट, संक्रमणाची क्षमता वाढ आणि इम्युन एस्केप (विशेषत:B.1.351 याची) प्रक्रिया वाढली असं आयसीएमआरनं म्हटलं आहे