वयोवृद्ध शेतकरी आंदोलकांसाठी उत्तराखंडच्या शेतकऱ्यांनी केली ही ‘खास’ सोय.

या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अत्याधुनिक पद्धतीने ट्रॉली तयार करून आणली आहे. यामध्ये झोपण्यासाठी गाद्या, फोन चार्जिंगची सुविधा , थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेट , वातानुकूलित ए सी आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.

नवी दिल्ली: केंद्र सरकारने तयार केलेल्या तीन कृषी (Farmer low ) कायद्यांच्या विरोधात मागील ११ दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. गाजीपूर सीमेवर सुरू असलेल्या आंदोलना पाठिंबा देण्यासाठी उत्तराखंड मधील शेतकरीही सहभागी झाले आहेत. या कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या आंदोलनात मोठया संख्येने शेतकरी सहभागी झाले आहे. यात वयोवृद्ध शेतकऱ्याचाही समावेश अधिक आहे.

या वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या मदतीसाठी अत्याधुनिक पद्धतीने ट्रॉली तयार करून आणली आहे. यामध्ये झोपण्यासाठी गाद्या, फोन चार्जिंगची सुविधा , थंडीपासून बचावासाठी ब्लॅंकेट , वातानुकूलित ए सी आदी सुविधा देण्यात आल्या आहेत.

आंदोलनात सहभागी झालेल्या वयोवृद्ध आंदोलकांसाठी या सुविधा तयार केली आहे , जेणे करून त्यांना आवश्यक तो आराम मिळेल अशी माहिती , उत्तराखंड Uttarakhand येथील शेतकऱ्यांनी दिली आहे.