children infected with corona

भारत बायोटेक कंपनीने नेजल व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. या लसीद्वारे नाकातून डोस दिले जातील. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ सोम्या स्वामीनाथन यांच्या मते हे कोरोना विषाणूंपासून मुलांना संरक्षण देण्यात प्रभावी ठरू शकते.

    नवी दिल्ली: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसला आहे. या लाटेचा प्रभाव कमी होत असतानाच तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना लक्ष्य करू शकते. सद्यस्थितीला २ वर्षाखालील मुलांना कोरोना लस दिली जात नाही आहे. एवढेच नव्हे तर भारतात अद्याप 18 वर्षांखालील मुलांना देखील लस घेण्यासाठी मंजुरी मिळालेली नाही. यासगळ्या गोष्टींमध्ये लहान मुलांच्या लसीकरणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) की चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी महत्वाची माहिती दिली आहे. स्वामीनाथन यांच्यामते नेजल व्हॅक्सिन अर्थात नाकावाटे दिली जाणारी लस (Nasal Corona Vaccine) लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. ही लस इतर लशींपेक्षा अधिक फायदेशीर ठरणारी असेल. शिवाय ही लस घेणे देखील सहजसोपे असेल.

    याबरोबरच अधिकतर शालेय शिक्षकांनी व्हॅक्सिन घेणे आवश्यक आहे. तसेच जेव्हा मुलांमध्ये कोरोना विषाणू प्रसारित होण्याचा धोका कमी होईल तेव्हाच मुलांना शाळेत पाठवावे. ‘भारतात बनलेली नेजल व्हॅक्सिन लहान मुलांसाठी गेम चेंजर ठरू शकते. मुलांना ही लस देणे सोपे आहे. शिवाय ही रेस्पिरेटरी ट्र्रॅकमध्ये प्रतिकारशक्ती वाढवेल असेही त्या म्हणाल्या आहेत.

    हैद्रराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने नेजल व्हॅक्सिनची चाचणी सुरू केली आहे. या लसीद्वारे नाकातून डोस दिले जातील. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ शास्त्रज्ञ सोम्या स्वामीनाथन यांच्या मते हे कोरोना विषाणूंपासून मुलांना संरक्षण देण्यात प्रभावी ठरू शकते. हे व्हॅक्सिन नाकावाटे दिले जाणार आहे. कंपनीच्या मते नेजल स्प्रेचे केवळ ४ थेंब पुरेसे असतील. दोन्ही नाकपुड्यांमध्ये दोन-दोन थेंब टाकले जातील.