अफगाणी चिमुकल्यांचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल ….

अनेक समस्यांचा डोंगर उभा असताना, ही चिमुकली भावंडं मात्र आपल्याच जगात मग्न आहेत. त्यांना आसपास घडणाऱ्या मृत्यू तांडवचा आणि दहशतीचा पूर्णपणे विसर पडला आहे

    दिल्ली: तालिबान्यांनी अफगाणिस्थानवर कब्जा मिळवल्यानंतर देशात हाहाकार माजला आहे. अनेक अफगाणी नागरिक जीव वाचवण्यासाठी देश सोडून पळत आहेत. अशातच सोशल मीडियावर एक अफगाणी चिमुकल्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

    ज्यामध्ये एक चिमुकली आपल्या भावला मुके घेताना दिसत आहे. खरंतर, धगधगत्या अफगाणिस्तानातून भारतात आल्यानंतर डोक्यावर अनेक समस्यांचा डोंगर उभा असताना, ही चिमुकली भावंडं मात्र आपल्याच जगात मग्न आहेत. त्यांना आसपास घडणाऱ्या मृत्यू तांडवचा आणि दहशतीचा पूर्णपणे विसर पडलेला या व्हिडीओ तून दिसून आले आहे.