This young man has traveled 1 lakh km by bike in 2 years

अंशने देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. मागील २ वर्षांपासून तो प्रवास करत आहेत. आता तो उत्तराखंडमध्ये असून त्याने दिल्ली आणि उत्तरप्रदेश पालथा घातला आहे. त्याचे पुढील स्थानक हे हिमाचल प्रदेश असणार आहे.

दिल्ली : अनेकांना जनजागृती करण्याचा ध्यास असतो. त्यासाठी कोणत्याही मार्गाचा वापर करताना काही तरुण दिसतात. अशाचप्रकारे दिल्लीतील एक तरुण बाईकने भ्रमंती करुन जनजागृती करत आहे. या तरुणाचे नाव अंश आहे. त्याने आतापर्यंत बाईकने १ लाख किलोमीटरचा प्रवास केला आहे.

अंशने देशातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन जनजागृती करण्याचे काम केले आहे. मागील २ वर्षांपासून तो प्रवास करत आहेत. आता तो उत्तराखंडमध्ये असून त्याने दिल्ली आणि उत्तरप्रदेश पालथा घातला आहे. त्याचे पुढील स्थानक हे हिमाचल प्रदेश असणार आहे.

२ ऑक्टोबर २०१८ ला त्याने आपली ही मोहीम सुरु केली आहे. मागील 2 वर्षात अनेक संकटांचा सामना करत त्याने आपला हा अविरत प्रवास सुरु ठेवला आहे. या मोहिमेत तो हेल्मेट(Helmet) आणि वाहतुकीच्या नियमांसंबंधी जनजागृती करत असून वाहतुकीच्या नियमांचे महत्व समजावून सांगत आहे. या काळात त्याने डोंगराळ प्रदेशातून तसंच पठारी प्रदेशातून देखील प्रवास केला असून वाहतुकीच्या नियमांचं (Traffic Rules) महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे. नागरिकांनी १०० टक्के वाहतुकीच्या नियमांचं पालन केलं तर ते आपला जीव वाचवू शकतील त्याचबरोबर दुसऱ्यांचा देखील जीव वाचवू शकतील असं तो म्हणतो. भारतात वाहतुकीच्या नियमाचं पालन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचं त्यानं म्हटलं आहे. त्यामुळं भारतातील अपघातांचं प्रमाण कमी होण्यासाठी तो ही जनजागृती मोहीम करत आहे.

अंश आपला खर्च भागवण्यासाठी ऑनलाईन काम करतो. यातूनच तो आपली कमाई करुन फिरण्याचा खर्च भागवत असतो. ज्या भागाला तो भेट देतो त्याठिकाणी तो नागरिकांना एकत्र आणण्याचं काम करतो. यामध्ये भविष्यातील जनजागृती मोहिमांमध्ये त्याला याचा फायदा होणार आहे. त्यामुळं अशा या ध्येयवेड्या नागरिकांमुळं भारताचं भविष्य उज्ज्वल असून त्याच्या या प्रेरणादायी कामामधून अनेक तरुणांना देखील प्रेरणा मिळणार आहे.