प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

प्रत्यक्ष ताबारेषेवरून (एलएसी) पूर्व लडाखमध्ये वाद उद्भवला असतानाही चीनच्या कुरापती सुरूच आहे. चीनने पश्चिम अरुणाचल प्रदेशमध्ये भारत, चीन आणि भूतानच्या सीमेजवळ तीन गावे वसवली आहेत. याची छायाचित्रे उपग्रहाने टिपली आहेत.

दिल्ली (Delhi).  प्रत्यक्ष ताबारेषेवरून (एलएसी) पूर्व लडाखमध्ये वाद उद्भवला असतानाही चीनच्या कुरापती सुरूच आहे. चीनने पश्चिम अरुणाचल प्रदेशमध्ये भारत, चीन आणि भूतानच्या सीमेजवळ तीन गावे वसवली आहेत. याची छायाचित्रे उपग्रहाने टिपली आहेत.

चीनने ज्या ठिकाणी ही तीन गावे वसवली आहेत, तो भाग बमलापासून सुमारे ५ किमी दूर आहे. चीनचे हे पाऊल दोन्ही देशांदरम्यान या क्षेत्रातील सीमावादाला अधिक गुंतागुंतीचे बनवू शकतो. चीनने या भागात केलेले नवे बांधकाम हे अरुणाचल प्रदेशलगतच्या भागावर आपला दावा मजबूत करण्याच्या चीनच्या अजेंड्याचा भाग आहे.