टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा; भारतीय नेमबाजी संघाची निवड ३ किंवा ४ एप्रिल रोजी

भारतीय नेमबाजांनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी १५ स्थानांची निश्चिती केली आहे; परंतु संघटनेच्या निवड धोरणानुसार खेळाडूंच्या सर्व स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारे संघाची निवड केली जाणार आहे.

    दिल्ली:  टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा ३ किंवा ४ एप्रिलला केली जाणार असून, कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक स्पर्धा प्रकारात दोन राखीव खेळाडूंचीही निवड होईल, अशी माहिती भारतीय रायफल संघटनेचे अध्यक्ष रणिंदर सिंग यांनी दिली. भारतीय नेमबाजांनी टोक्यो ऑलिम्पिकसाठी १५ स्थानांची निश्चिती केली आहे; परंतु संघटनेच्या निवड धोरणानुसार खेळाडूंच्या सर्व स्पर्धांमधील कामगिरीच्या आधारे संघाची निवड केली जाणार आहे. ‘ऑलिम्पिकसाठीच्या तयारीला आधीच खूप उशीर झाला असून क्रमवारीनुसार मिळणाऱ्या स्थानांची माहिती जागतिक संघटनेकडून ६ जूनला मिळेल; परंतु तोवर आणखी उशीर होईल. त्यापेक्षा ३ किंवा ४ तारखेला संघ निवड जाहीर करणे योग्य ठरेल, असे रणिंदर म्हणाले. सर्व नेमबाजांच्या कुटुंबीयांनाही विश्वासात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे, कारण हा वैयक्तिक निर्णय असेल. रायफल संघटना खेळाडूंवर बळजबरीने निर्णय लादू इच्छित नाही,’ असे रणिंदर यांनी सांगितले.