Trafficking of girls: एक दोन नव्हे तर तब्बल 75 मुलींशी केले लग्न आणि 200 तरुणींना बनवले…

बांगलादेशी मुलींची तस्करी(Trafficking of girls) करणारा मुनीर उर्फ मुनीरूल याने मध्यप्रदेशच्या इंदूर पोलिसांजवळ अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपीनी बांगलादेशमधून 200 हून अधिक मुलींना भारतात आणत त्यांना देहविक्रीच्या धंद्यात ढकलले होते. दर महिन्याला तो 55 हून अधिक मुली आणत असे. 5 वर्षापासून तो या धंद्यात आहे. आरोपीने आतापर्यंत 75 मुलींसोबत लग्न केले आहे. इंदूर एसआयटीने मुनीरला सूरतमधून अटक केली.

  दिल्ली : बांगलादेशी मुलींची तस्करी(Trafficking of girls) करणारा मुनीर उर्फ मुनीरूल याने मध्यप्रदेशच्या इंदूर पोलिसांजवळ अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपीनी बांगलादेशमधून 200 हून अधिक मुलींना भारतात आणत त्यांना देहविक्रीच्या धंद्यात ढकलले होते. दर महिन्याला तो 55 हून अधिक मुली आणत असे. 5 वर्षापासून तो या धंद्यात आहे. आरोपीने आतापर्यंत 75 मुलींसोबत लग्न केले आहे. इंदूर एसआयटीने मुनीरला सूरतमधून अटक केली.

  पोरस सीमेवरून भारतात आणायचा

  आरोपी मुलींना बांगलादेश आणि भारताच्या पोरस सीमेवरील नाल्याच्या रस्त्याने आणत असे आणि एजंटच्या माध्यमातून मुर्शिदाबाद आणि आसपासच्या ग्रामीण भागातून मुलींना भारतात आणत. इंदूर पोलिसांनी 11 महिन्यांआधी लसूडिया आणि विजय नगर परिसरात ऑपरेशन चालवत 21 तरुणींची सुटका केली होती. यातील 11 मुली बांगलादेशी होत्या आणि बाकी इतर ठिकाणच्या. या प्रकरणी सागर उर्फ सँडो, आफरीन, आमरीन आणि इतर आरोपींना पकडण्यात आलं होतं. मात्र, मुनीर फरार झाला होता. त्याला सूरतमधून पकडून इंदूरमध्ये आणण्यात आले.

  कोलकाता, मुंबईत प्रशिक्षण

  मुनीरचा पत्ता सांगणाऱ्याला पोलिसांनी दहा हजार बक्षीस जाहीर केले होते. तो बांगलादेशच्या जसोर येथील रहिवासी होता. बहुतेक मुलींसोबत त्याने लग्न केले आणि नंतर त्यांना भारतात आणून विकले. त्याच्या मागे मोठे नेटवर्क होते. सेक्स रॅकेटशी संबंधित टोळींकडून मुलींना आधी कोलकाता, नंतर मुंबईत प्रशिक्षण दिले जात होते, अशी माहिती मुनीरकडून मिळाली. यानंतर, मागणीनुसार तो भोपाळ आणि इतर शहरांमध्ये मुलींचा पुरवठा करायचा.

  बांगलादेशी मुलींना इथपर्यंत आणण्यामागील जी माहिती समोर आली त्यानुसार, बांगलादेशचे एजंट गरीब कुटुंबातील मुलींना काम मिळवून देण्याच्या बहाण्याने सीमा ओलांडून गुप्तपणे कोलकात्यात आणायचे. येथे त्यांना एका आठवड्यापेक्षा जास्त काळ ठेवण्यात येत. इथे त्यांना देहबोली आणि उत्तम राहण्याचे प्रशिक्षण देण्यात येत. ट्रेंड झाल्यावर मुलींना मुंबईला पाठवण्यात येत असे. इथे पुन्हा प्रशिक्षण देण्यात येत. यानंतर शहरांमधून आलेल्या मागणीनुसार मुलींना त्या शहरांमध्ये पाठवण्यात येत असे.