train tickets would be costly as railway is going to charge user fee on busy stations
गर्दीच्या रेल्वे स्टेशनांवर लवकरच यूझर चार्ज

  • रेल्वे प्रवासासाठी मोजावे लागणार जादा पैसे

नवी दिल्ली(new delhi): रेल्वेतून प्रवास (railway travel) करण्यासाठी आता जास्त पैसे (extra money) मोजावे लागणार आहेत. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ विनोद कुमार यादव यांनी हे संकेत दिले आहेत. विमानतळांवर आकारण्यात येणाऱ्या यूजर चार्जच्या धर्तीवर रेल्वे स्टेशनावंरही यूजर चार्ज आकारण्यात (charge user fee) येण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनीही खासगी रेल्वेंचे दर हे बाजार भावाच्या परिस्थितीनुसार निश्चित केले जातील, असे सांगितले आहे. रेल्वे प्रवासात अधिक पैसे आकारुन अतिरिक्त सेवाही आगामी काळात पुरवण्यात येतील.

किती रेल्वे स्टेशनांवर लागणार यूजर चार्ज ? (Railway Charge User Fee)

देशभरातील कूण रेल्वे स्टेशनांपैकी १० ते १५ टक्के रेल्वे स्टेशनांवर हा अतिरिक्त यूजर चार्ज आकारण्यात येणार आहे.
देशाताली १०५० रेल्वे स्टेशनांची मर्यादा वाढविण्यात येणार आहे. हे करण्यासाठी या स्टेशनांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. अशा स्टेशनांवर यूजर चार्ज आकारण्यात येईल. देशात सद्यस्थितीत सुमारे ७ हजार रेल्वे स्टेशन आहेत.

किती असेल यूजर चार्ज ?

यूजर चार्जबाबत लवकरच अधिसूचना काढण्यात येईल, असे रेल्वेतर्फे सांगण्यात आले आहे. मात्र ही रक्कम किती असेल, याबाबत विनोद कुमार यादव यांनी स्पष्ट सांगितले नाही. ही रक्कम कमी असेल असे संकेत मात्र त्यांनी दिले आहेत. मोठ्या आणि गर्दी असलेल्या स्टेशनावंर हा यूजर चार्ज आकारण्यात येणार आहे. तिकिट काढतानाच त्यातच हा यूझर चार्ज जोडूनच खिडकीवर तिकिट देण्यात येईल.

आम्ही युजर्सकडून चार्ज म्हणून अत्यंत नगण्य रक्कम आकारणार आहोत. आम्ही अशा स्थानकांवर युजर्सकडून रक्कम आकारणार आहोत ज्यांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे किंवा ज्यांचे नुतनीकरण झालेले आहे.

व्ही के यादव सीईओ आणि चेअरमन, रेल्वे बोर्ड