ट्रॅक्टर रॅली हिंसाचार प्रकरणी दोन कुख्यात आरोपींना जम्मू-काश्मीर येथून अटक; दिल्ली पोलिसांची कारवाई

आंदोलक शेतकऱ्यांनी २६ जानेवारीच्या दिवशी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण होवून हिंसाचाराची घटना घडली होती. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

    नवी दिल्ली: राजधानीच्या सीमेवर सुरूअसलेल्या शेतकरी आंदोलकांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. त्यावेळी घडलेल्या हिंसाचारात अनेक पोलीस जखमी झाले होते. या हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखाने दोन कुख्यात आरोपींना जम्मू काश्मीर येथून अटक केले आहे.

    केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीतील सीमांवर मागील अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्रसरकारच्या विरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी २६ जानेवारीच्या दिवशी ट्रॅक्टर रॅलीचे आयोजन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये तणाव निर्माण होवून हिंसाचाराची घटना घडली होती. यामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.