ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे. या दिनानिमिताने आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला ते प्रमुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ नोव्हेंबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली होती. त्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिलं होतं. ब्रिटननं ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे.

  • मोदींनाही दिले ‘रिटर्न गिफ्ट’

दिल्ली (Delhi).  ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले आहे. या दिनानिमिताने आयोजित राष्ट्रीय कार्यक्रमाला ते प्रमुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २७ नोव्हेंबर रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबरोबर फोनवरुन चर्चा केली होती. त्यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून येण्याचे औपचारिक आमंत्रण दिलं होतं. ब्रिटननं ही आपल्यासाठी मोठ्या सन्मानाची बाब असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे.

यावर्षी ब्रिटनमध्ये जी ७ परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव डॉमनिक राब यांनी मंगळवारी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याशी केलेल्या चर्चेदरम्यान बोरिस जॉन्सन यांनी निमंत्रण स्वीकारल्याची घोषणा केली.
बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर त्यांचा पहिला मोठा भारत दौरा असेल. ब्रेक्झिटनंतर पहिल्यांदाच ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावर येत असल्यामुळे हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपण त्यांचं निमंत्रण स्वीकारलं असल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जी ७ परिषदेसाठी उपस्थित राहण्याचं निमंत्रणही दिलं आहे. दरम्यान, ब्रिटनला भारतासोबत आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याची इच्छा असल्याची माहिती ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली.

एस. जयशंकर आणि डॉमनिक राब यांच्या चर्चेदरम्यान दहशतवाद आणि कट्टरताबादामुळे निर्माण झालेल्य़ा समस्यांवर चर्चा करण्यात आली. “आम्ही अफगाणिस्तानातील परिस्थिती, आखाती देश आणि हिंद महासागर क्षेत्रातील परिस्थितीची समीक्षा केली. भारत आणि ब्रिटन करोना महासाथीनंर पुन्हा एकदा आर्थिकरित्या रुळावर येण्यासाठी परस्पर सहकार्य अधिक दृढ करतील,” असंही त्यांनी यावेळी सांगितलं.