प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीवयात एकसमानता असावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवृत्तीवयात एकसमानता असेल तर न्यायाधीश कोणत्याही अपेक्षेशिवाय कामातून मुक्त होऊन नवीन जबाबदारी पेलतील, असे याचिकेत नमूद केले आहे.

    दिल्ली : हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट यांच्या न्यायाधीशांच्या निवृत्तीवयात एकसमानता असावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवृत्तीवयात एकसमानता असेल तर न्यायाधीश कोणत्याही अपेक्षेशिवाय कामातून मुक्त होऊन नवीन जबाबदारी पेलतील, असे याचिकेत नमूद केले आहे.

    ज्येष्ठ वकील व भाजपा नेते आश्विनीकुमार यांनीही याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट यांच्यातील दुय्यमपणाची दरी कमी करण्यासाठी या दोन्ही कोर्टातील जजचे सेवानिवृत्ती वय सारखे ठेवणेच योग्य असेल.

    तसेच वयात तफावत ठेवणे हे तर्कशून्य असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. त्यामुळेच दोन्ही न्यायालयातील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय 65 असावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.