केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक हे आयुर्वेदाशी संबंधित आहेत. त्यांना कोरोनाची लक्षण आढळल्याने कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पण त्यांना लक्षणे नसल्यानं होम आयोसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे.

दिल्ली : देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतःच ट्विट करत माहिती दिली आहे. 

केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक हे आयुर्वेदाशी संबंधित आहेत. त्यांना कोरोनाची लक्षण आढळल्याने कोरोना चाचणी केली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पण त्यांना लक्षणे नसल्यानं होम आयोसोलेशनमध्ये राहण्यास सांगितले आहे. याबाबत नाईक यांनी स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, आज मी कोविड-१९ चाचणी केली आहे. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोणताही त्रास होत नाही आहे. त्यामुळे मला होम आयसोलेशन मध्ये राहण्यास सांगितले आहे. माझासोबत संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वतःची काळजी घ्यावी आणि कोरोना चाचणी करावी अशी विनंतीही त्यांनी केली आहे.