Big expansion in Union Cabinet? 23 ministers will be required

केंद्रीय कॅबिनेटमध्ये विस्ताराची चर्चा सुरू होताच महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचाली वाढल्या आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आघाडी सरकारतर्फे केंद्रावर करण्यात येणारे हल्ले तसेच मागासवर्गीयांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी भाजपा रणनीती आखत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, नारायण राणे अथवा प्रितम मुंडे यांची वर्णी लावण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांसोबत चर्चा करतेवेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील मुद्यांचा आढावा घेतला. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष यांचा समावेश होता.

  दिल्ली : केंद्रीय कॅबिनेटमध्ये विस्ताराची चर्चा सुरू होताच महाराष्ट्राच्या राजकारणातही हालचाली वाढल्या आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून आघाडी सरकारतर्फे केंद्रावर करण्यात येणारे हल्ले तसेच मागासवर्गीयांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी भाजपा रणनीती आखत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाचे केंद्रीय नेतृत्व केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस, नारायण राणे अथवा प्रितम मुंडे यांची वर्णी लावण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांसोबत चर्चा करतेवेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील मुद्यांचा आढावा घेतला. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष यांचा समावेश होता.

  राणेंचीही लागू शकते वर्णी!

  मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर होणारे हल्ले थोपविण्यासाठी भाजपा नारायण राणेंचा केंद्रीय कॅबिनेटमध्ये समावेश करू शकतो. राणे स्वत: मराठा आहेत आणि त्यांचे नेतृत्वही मराठ्यांना मान्य आहे शिवाय कोकण भागातही त्यांचा दबदबा आहे. त्यामुळे कोकणात बऱ्याच वर्षापासून पाळेमुळे रोवण्याचीही रणनीती भाजपाची आहे. याशिवाय आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांच्या प्रश्नांना आक्रमक उत्तरे देण्यासाठी भाजपालाही मोठी मदत होऊ शकते. पूर्वी शिवसेनेत असल्यामुळे त्यांचेही अनेक शुभचिंतक आहेत. त्यामुळेच शिवसेनेचा प्रभाव असलेल्या भागात वर्चस्व स्थापन करण्यास राणेंची मदत होऊ शकते, असे भाजपाला वाटते.

  मागासवर्गियांचा विश्वास मिळविण्याचा प्रयत्न

  राज्यातील मागासवर्गही भाजपापासून दूर जात असल्याचे दिसत आहे. एकनाथ खडसेंसारखे नेते राष्ट्रवादीत गेले तर गटबाजीमुळे पंकजा मुंडेंनाही विधानसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला होता. यासाठी देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरण्यात आले होते. त्यामुळेच मागासवर्गात विश्वास कायम ठेवण्यासाठी प्रीतम मुंडे यांचाही कॅबिनेटमध्ये समावेश करण्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.

  हे सुद्धा वाचा