केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मातोश्रींचे निधन

डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मातोश्रींच्या नीधनाने अतिशय दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. तर मी पृथ्वीतलावरील सर्वात प्रिय व्यक्तीला गमावल्याचे त्यांनी म्हटले. आज सकाळी ह्रदयरोगाचा झटका आल्याने ती स्वर्गवासी झाली आहे.

दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्या मातोश्रींचे निधन झाले आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हर्षवर्धन यांच्या मातोश्री मागील अनेक दिवसांपासून ह्रदय रोगाच्या आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरु होते. डॉ. हर्षवर्धन यांनीच आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली आहे.


डॉ. हर्षवर्धन यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मातोश्रींच्या नीधनाने अतिशय दुःख झाल्याचे त्यांनी सांगितले. तर मी पृथ्वीतलावरील सर्वात प्रिय व्यक्तीला गमावल्याचे त्यांनी म्हटले. आज सकाळी ह्रदयरोगाचा झटका आल्याने ती स्वर्गवासी झाली आहे. माझ्यासाठी विशाल व्यक्तीमत्त्व, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असलेली आई गेल्याने मी पोरका झालो आहे. तिची उणीव कुणीही भरुन काढू शकत नाही. असे हर्षवर्धन यांनी लिहिले आहे. हर्षवर्धन अत्यंत भावूक झाले आहेत.