union home minister Amit Shah health deteriorated again admitted to AIIMS delhi

काही दिवसांपूर्वीच गृहमंत्री (union home minister) अमित शहा (Amit Shan) यांना कोरोनाची (corona) लागण झाली होती.

नवी दिल्लीः केंद्रीय गृहमंत्री (union home minister) अमित शहा (Amit Shah) यांना बर्‍याच दिवसांपासून आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अमित शहा यांना पुन्हा दिल्लीतील एम्समध्ये (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी रात्री ११ वाजता एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

काहीच दिवसांपूर्वी गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची (corona) लागण झाली होती. दरम्यान, उपचारानंतर कोरोना रिपोर्ट (corona report) निगेटिव्ह आल्यानंतर अमित शहा यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता पुन्हा श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे अमित शहा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी (saturday) रात्री ११ वाजता अमित शहा यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, कोरोना संसर्गातून मुक्त झाल्यानंतर अमित शहा यांना श्वास घेताना त्रास जाणवत आहे. अमित शहा यांनी काही काळ रुग्णालयात राहावे. रुग्णालयात त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली चांगले उपचार होतील, असे एम्समधील एका सूत्राने सांगितले. दरम्यान, अमित शाह यांना एम्समधील कार्डियो न्यूरो टॉवरमध्ये दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, याआधी अमित शहा यांना १८ ऑगस्टला नवी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या नेतृत्वातील डॉक्टरांच्या एका पथकाच्या देखरेखीखाली अमित शहा यांच्यावर उपचार सुरु होते. ताप आला होता, त्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.

अमित शहा यांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट २ ऑगस्टला पॉझिटिव्ह आला होता. यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल केले होते. अमित शहा कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर सामान्यांपासून ते दिग्गजांनी त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. १२ दिवसानंतर म्हणजेच १४ ऑगस्टला अमित शहा कोरोनामुक्त झाले आणि त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला.