शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही – पूजा मोरे

सरकारने लक्षात घ्यावे की जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत एकही शेतकरी येथून परतणार नाही

 

नवी दिल्ली: जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नसल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा पूजा मोरे यांनी दैनिक नवराष्ट्रसोबत बातचीत करताना व्यक्त केले. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मागील पाच दिवसांपासून त्या दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत.

आंदोलनामध्ये आतंकवादी, खलिस्थानवादी लोकांचा सहभाग असल्याचा सरकार कडून खोटा आरोप केला जात आहे. या आंदोलनमध्ये दोन-दोन महिन्याच्या लहान मुलांसह अनेक महिला शेतकरी तरुण, वयोवृद्ध शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. केंद्र सराकारला जरा दहा -पंधरा दिवसात आंदोलक परत जातील असे वाटत असेल ,परंतु सरकारने लक्षात घ्यावे की जोपर्यंत कृषी कायदे मागे घेतले जात नाहीत तोपर्यंत एकही शेतकरी येथून परतणार नाही. नसल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे.

अनेक सुशिक्षित तरुण मुले या आंदोलनात सहभागी झाली आहेत. आंदोलन स्थळावरील प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाला आपला बाप शेतकरी आहे याचा अभिमान वाटतो. सेवाभावी वृत्तीने आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांना मदत केली जात आहे चित्र दिसून येत असल्याचेही त्या म्हणाल्या.