farmers in delhi

खलिस्तानचं समर्थन करणारे पोस्टर घेऊन दिसलेले आंदोलक असोत वा उमर खालिदच्या सुटकेच्या घोषणा देणारा समूह. ज्या प्रश्नावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, ते प्रश्न सोडून इतर मुद्द्यांना खतपाणी देण्याच्या हेतूनं या आंदोलनात काही असामाजिक घटक घुसल्याचं उत्तर पोलीस पोलिसांचं म्हणणं आहे. याला आळा घालण्यासठी काही पोलीस अधिकाऱ्यांना या आंदोलनावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलीय.

केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनामध्ये अनेक असामाजिक घटक घुसल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी एक नवा प्लॅन आखलाय.

खलिस्तानचं समर्थन करणारे पोस्टर घेऊन दिसलेले आंदोलक असोत वा उमर खालिदच्या सुटकेच्या घोषणा देणारा समूह. ज्या प्रश्नावर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, ते प्रश्न सोडून इतर मुद्द्यांना खतपाणी देण्याच्या हेतूनं या आंदोलनात काही असामाजिक घटक घुसल्याचं उत्तर पोलीस पोलिसांचं म्हणणं आहे. याला आळा घालण्यासठी काही पोलीस अधिकाऱ्यांना या आंदोलनावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलीय.

हे पोलीस आंदोलकांमध्येच राहून अशा असामाजिक तत्त्वांवर लक्ष ठेवण्याचं काम करतील, अशी माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी म्हटलंय. आंदोलनाच्या आडून देशविघातक कृत्यांचं समर्थन करू पाहणाऱ्यांना शोधून त्यांना आंदोलनातून बाहेर काढण्याचं काम केलं जाणार आहे. त्यांच्यावर कारवाई केली जाणार असून आंदोलनाला वेगळी दिशा मिळणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, अशी माहिती प्रशांत कुमार यांनी दिलीय.

दिल्लीच्या सीमांवर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील शेतकरी गेल्या १८ दिवसांपासून आंदोलन करतायत. केंद्र सरकारनं नवे कृषी कायदे रद्द करावेत, अशी त्यांची मागणी आहे. शेतकऱ्यांना आक्षेपार्ह वाटणारे मुद्दे कायद्यातून काढून टाकण्याची प्रक्रिया राबवण्याचं आश्वासन सरकारच्या वतीनं आंदोलक शेतकऱ्यांना देण्यात आलं होतं. मात्र हा पर्याय शेतकऱ्यांना मान्य नाही. जोपर्यंत सरकार हे तिन्ही कायदे रद्द करत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलंय.