शेतकरी आंदोलनात उमर खालिद, शरजील इमाम यांच्या सुटकेच्या घोषणा, आंदोलनाच्या विरोधकांकडून जोरदार टीका

दिल्ली दंगलप्रकरणातील आरोप उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या सुटकेच्या घोषणा या आंदोलनात दिल्या गेल्या, असा आरोप सध्या ट्विटरवरून केला जाऊ लागला आहे. सत्ताधारी भाजपचे नेते आणि समर्थक सध्या ट्विटरवर उमर खालिद आणि शरजील इमाम यांचे पोस्टर्स घेऊन घोषणा देणाऱ्या आंदोलकांच्या फोटोवर जोरदार टीका करतायत.

केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनात विविध विचारप्रवाह असल्याचं पुन्हा एकदा समोर येतंय. त्यामुळे या आंदोलनात खलिस्तानची मागणी करणारे आणि जिहादी गट आपला अजेंडा चालवण्याची संधी शोधत असल्याचा आरोप होतोय.

दिल्ली दंगलप्रकरणातील आरोप उमर खालिद आणि शरजील इमाम यांच्या सुटकेच्या घोषणा या आंदोलनात दिल्या गेल्या, असा आरोप सध्या ट्विटरवरून केला जाऊ लागला आहे. सत्ताधारी भाजपचे नेते आणि समर्थक सध्या ट्विटरवर उमर खालिद आणि शरजील इमाम यांचे पोस्टर्स घेऊन घोषणा देणाऱ्या आंदोलकांच्या फोटोवर जोरदार टीका करतायत. गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्या या दोघांशी शेतकरी आंदोलकांना काय देणं-घेणं आहे, असा सवाल नेटीझन्स करतायत.

उमर खालिद आणि शरजील इमाम हे कधीपासून शेतकरी झाले, असा सवाल भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केलाय. शेतकऱ्यांशी सरकारने संवाद साधायला हवा, मात्र देशविघातक शक्तींचं समर्थन शेतकरी आंदोलनात केलं जाणं योग्य नसल्याची टीका होते आहे. शेतकऱ्यांना दंगलीतील आरोपींना सोडवण्याची इच्छा आहे का, असा सवाल भाजप महिला मोर्चाच्या सोशल मीडिया प्रभारी प्रिती गांधी यांनी केलाय.

तर या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या विरोधी पक्षांनी ही मागणी योग्यच असल्याचं म्हटलंय. आंदोलनात विविध विचारांचे प्रवाह आले असून हा शेतकऱ्यांचा प्रश्न नसला, तरी जे मागणी करत आहेत, त्यांची मागणी योग्यच असल्याचं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे.