प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना विषाणूवरील लसीची प्रतिक्षा संपूर्ण जगात केली जात आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता लवकरच लस उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे. आता ही लस आपल्या मोबाईलशी कनेक्टेड असेल, असे संकेत मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोविड-१९ लसीकरण अभियानात मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रदान मोदी यांनी मंगळवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी-2020) च्या चौथ्या सत्राचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर कोरोना लसीकरण अभियानात केला जाणार असल्याचे सांगितले.

दिल्ली (Dehli).  कोरोना विषाणूवरील लसीची प्रतिक्षा संपूर्ण जगात केली जात आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता लवकरच लस उपलब्ध होण्याची शक्यता बळावली आहे. आता ही लस आपल्या मोबाईलशी कनेक्टेड असेल, असे संकेत मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोविड-१९ लसीकरण अभियानात मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर केला जाणार असल्याचे म्हटले आहे. पंतप्रदान मोदी यांनी मंगळवारी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे इंडिया मोबाईल काँग्रेस (आयएमसी-2020) च्या चौथ्या सत्राचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी मोबाईल टेक्नॉलॉजीचा वापर कोरोना लसीकरण अभियानात केला जाणार असल्याचे सांगितले.

विकासात टेलिकॉम सेक्टरची महत्त्वाची भूमिका
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, मोबाईल उत्पादनासाठी भारताला पसंती देण्यात येत आहे. भारतात अ‍ॅपची बाजारपेठ वेगाने विकसित होत असून मोबाईलचे शुल्कही कमी आहे. भारताच्या विकासात टेलिकॉम सेक्टरने महत्त्वाची भूमिका आहे. भारतात टेलिकॉम क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. पण अजूनही आपल्याला दूरचा पल्ला गाठायचा आहे, असे मोदी म्हणाले. मोबाईलच्या माध्यमातून शेतकरी, आरोग्य क्षेत्र, शिक्षण आणि अन्य क्षेत्रातील लोकांच्या जीवनात कसा बदल घडवता येईल याकडे आता आपल्याला लक्ष दिले पाहिजे असे मोदी म्हणाले.

5G साठी एकत्रित प्रयत्न आवश्यक
तीन वर्षात सर्व गावांमध्ये हायस्पीड इंटरनेट सुविधा उपलब्ध होईल असे मोदींनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या अपग्रेडेशनमुळे सतत मोबाईल हँडसेट आणि उपकरण बदलण्याची आपली संस्कृती बनली आहे. यातून जमा होणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कचऱ्याची अधिक चांगल्या पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यासाठी इंडस्ट्रीने विचार केला पाहिजे. भविष्याच्या दृष्टीने लाखो भारतीयांना सक्षम करण्यासाठी 5G सेवा वेळेवर आणण्यासाठी आपल्याला एकत्र काम करायचे आहे. मोबाईल टेक्नोलॉजीमुळेच आपल्याला लाखो भारतीयांपर्यंत वेगवेगळे फायदे पोहोचविणे शक्य झाले आहे. कोरोना संकटाच्या या काळात मोबाईलमुळेच गरीबांना लगेच मदत करणे शक्य झाले. भारताला फोन उत्पादनाची राजधानी बनवण्यासाठी सर्वांनी एकत्र मिळून काम करूया असे मोदी म्हणाले.