पेगॅससचा राजकीय शस्त्र म्हणून वापर, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा : राहुल गांधी यांची मागणी

इस्रायलने दहशतवाद्यांविरूद्ध वापरण्यासाठी वर्गीकृत केलेले पेगॅसस हे एक शस्त्र आहे. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्याविरूद्ध याचा वापर एक राजकीय शस्त्र म्हणून केला, त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी झाली पाहीजे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगॅसस हेरगिरी प्रकरणात उडी घेतल्याने संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा चांगलाच गाजत आहे. दरम्यान, आज (शुक्रवार) राहुल गांधी यांनी पेगॅससचा राजकीय शस्त्र म्हणून वापर झाल्याचा आरोप करत केंद्रीय गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

    इस्रायलने दहशतवाद्यांविरूद्ध वापरण्यासाठी वर्गीकृत केलेले पेगॅसस हे एक शस्त्र आहे. मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आमच्याविरूद्ध याचा वापर एक राजकीय शस्त्र म्हणून केला, त्यामुळे याची न्यायालयीन चौकशी झाली पाहीजे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी याप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.

    केंद्र सरकारवर मोठा आरोप करत राहुल गांधी म्हणाले की, माझा फोन टॅप केला जात आहे. मला हे माहित आहे. बरेच गुप्तचर अधिकारी म्हणाले की सर आपला फोन टॅप केला जात आहे.