एसबीआयचे डेबिट कार्ड वापरताय? मग या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा…

एसबीआयने म्हटले आहे की डेबिट कार्ड इंडिया पोस्टद्वारे वितरीत केले जाते. तसेच बँकेने असा सल्ला दिला आहे की अशा प्रकारच्या डिलिव्हरीबद्दल जाणून घेण्यासाठी पोस्ट ऑफिसशी संपर्क साधला पाहिजे. जर पोस्ट ऑफिसद्वारे डिलिव्हरी केली गेली नसेल किंवा ती रिटर्न म्हणून चिन्हांकित केली गेली असेल तर ती सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॉक करण्यासाठी बँकेत पाठविली जाईल.

    नवी दिल्ली : आपण नेहमी पाहतो की, जेव्हा आपण नवीन डेबिट कार्डसाठी अर्ज करता तेव्हा बँकेकडून एक कन्फर्मेशन येते की, आपले कार्ड पाठवले आहे, मात्र आपल्याला प्राप्त होत नाही. अलिकडेच, एका ग्राहकालाही अशाच प्रकारची समस्या भेडसावत होती, त्यानंतर ग्राहकांनी बँकेला टॅग केले आणि सोशल मीडियावर विचारले की, एटीएम डिस्पॅच केल्यानंतर डिलिव्हरी होण्यास किती वेळ लागेल. यावर एसबीआयने ट्विटरवरच माहिती दिली असून एटीएम न मिळाल्यास काय करावे हे सांगितले आहे.

    काय आहेत बँकेचे नियम?

    एसबीआयने म्हटले आहे की डेबिट कार्ड इंडिया पोस्टद्वारे वितरीत केले जाते. तसेच बँकेने असा सल्ला दिला आहे की अशा प्रकारच्या डिलिव्हरीबद्दल जाणून घेण्यासाठी पोस्ट ऑफिसशी संपर्क साधला पाहिजे. जर पोस्ट ऑफिसद्वारे डिलिव्हरी केली गेली नसेल किंवा ती रिटर्न म्हणून चिन्हांकित केली गेली असेल तर ती सुरक्षेच्या दृष्टीने ब्लॉक करण्यासाठी बँकेत पाठविली जाईल.

    बँकेने दिलेल्या माहितीनुसार, त्यानंतर हे कार्ड ग्राहकांच्या शाखेत पाठवले जाते, तेथून ग्राहक ते कलेक्ट करू शकतात. बँकेने सांगितले की ही संपूर्ण प्रक्रियेसाठी 10-15 दिवस लागतात आणि ते आपल्या पत्त्यावर देखील अवलंबून असते. बँकेच्या ट्वीटनुसार, तुम्हाला असे झाल्यास तुमची केवायसी कागदपत्रे व पासबुक घेऊन बँक शाखेत जा आणि एटीएम कार्ड कलेक्ट करा.