जस्टिन ट्रूडोनी पुन्हा शेतकरी आंदोलनावर व्यक्त केले ‘हे’ मत

यापूर्वीही शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत ट्रूडो यांनी आपले मत व्यक्त केले होते, त्यांनी भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत व्यक्त केलेल्या चिंतेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कडक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती . भारताच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप न करण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला होता.

‘जगभरात शांतीपूर्ण पद्धतीने केल्या जाणाऱ्या विरोध – निदर्शनाच्या समर्थनात कॅनडा कायम उभा राहिला आहे, .. आणि आम्ही तणाव कमी करून चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी उचलण्यात आलेल्या पाऊलाबाबत अत्यंत आनंदी असल्याचे’ , सूचक मत सरकारचे नाव न घेता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau)यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केले आहे.
यापूर्वीही शेतकऱ्यांच्या आंदोलना( farmer Protest) बाबत ट्रूडो यांनी आपले मत व्यक्त केले होते, त्यांनी भारतात (India)सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत व्यक्त केलेल्या चिंतेनंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून कडक प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली होती . भारताच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप न करण्याचा सल्लाही त्यांना देण्यात आला होता. ‘कॅनडानं नेहमीच शांततामय मार्गानं सुरू असलेल्या आंदोलनांना पाठिंबा दिलाय. आम्ही संवादावर विश्वास ठेवतो. आम्ही भारतीय प्रशासनाकडेही याबाबतची चिंता व्यक्त केली’ असं ट्विट ट्रुडो यांनी केलं होतं. त्यावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी ट्रुडो यांच्या टिप्पणीवर,  ‘आम्ही भारतीय शेतकऱ्यांशी संबंधित कॅनडाच्या नेत्यांची टिप्पणी पाहिली, परंतु ही प्रतिक्रिया चुकीच्या माहितीवर आधारीत आहे. या पद्धतीच्या टिप्पण्या अनावश्यक आणि निरुपयोगी आहेत. विशेषकरून जेव्हा ही बाब एका लोकशाही देशातील अंतर्गत मुद्द्यासंबंधीत असेल. अशा गोष्टी राजकीय हेतूनं चुकीच्या पद्धतीनं समोर आणू नये, हीच योग्य गोष्ट ठरेल’ असं प्रत्यूत्तर श्रीवास्तव यांनी दिलं होतं. पंजाब -दिल्लीच्या सीमेवर सरकारने तयार केलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला भारतासह परदेशातूनही सोशल मीडियाद्वारे पाठिंबा दिला जात आहे.