आता लसीकरण सर्टिफिकेट पासपोर्टला लिंक करणार, परदेशी जाणाऱ्यांना मुदतीपूर्वी लस मिळणे शक्य, अशी आहे पॉलिसी

या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस घेतल्यानंतर मिळणारं सर्टिफिकेट हे नागरिकांच्या पासपोर्टशी लिंक करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा इतर कारणांसाठी देशाबाहेर जाणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होणार असून इतर देशांनाही त्या व्यक्तीचं लसीकरण झालं आहे की नाही,याची ऑफिशियल माहिती मिळू शकणार आहे. 

    जगभरात कोरोनानं धुमाकूळ घातल्यानंतर आता एका देशातून दुसऱ्या देशात जाण्याचे निकष कमालीचे बदललेत. सध्या भारतात कोरोनाची दुसरी लाट असल्यामुळे अनेक देशांनी भारतातून येणारी आणि जाणारी विमानं बंद करण्याचा निर्णय घेतलाय. लाट ओसरल्यानंतर कदाचित आंतरराष्ट्रीय वाहतूक सुरूही होईल. आपल्या देशात येणाऱ्या नागरिकांनी कोरोनाची लस घेतलेली असणं, हे अनेक देशांनी बंधनकारक केलंय.

    या पार्श्वभूमीवर कोरोनाची लस घेतल्यानंतर मिळणारं सर्टिफिकेट हे नागरिकांच्या पासपोर्टशी लिंक करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतलाय. शिक्षणानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त किंवा इतर कारणांसाठी देशाबाहेर जाणाऱ्या नागरिकांना त्याचा फायदा होणार असून इतर देशांनाही त्या व्यक्तीचं लसीकरण झालं आहे की नाही,याची ऑफिशियल माहिती मिळू शकणार आहे.

    टोकियो ऑलिम्पिकसाठी मोठ्या संख्येने खेळाडू आणि इतर चमू जपानला जाणार आहे. त्या सर्वांचे पासपोर्ट आणि लसीकरण सर्टिफिकेट लिंक केलं जाणार आहे. सध्या कोरोना लसीच्या दोन डोसमध्ये किमान ८४ दिवसांचं अंतर राखण्याचा नियम आहे. मात्र एखाद्या नागरिकाला त्यापूर्वीच  परदेशी जावं लागणार असेल, तर त्यांना मुदतीपूर्वीदेखील लस मिळेल, याची सोय केली जाईल, असं सरकारनं म्हटलंय.

    कोरोना लसीकरण आणि आंतरराष्ट्रीय प्रवास यांच्याशी संबंधित अनेक तक्रारी सरकारकडे येत होत्या. लसीकरणाचे पुरावे दिल्याशिवाय नागरिकांना परदेशी जाण्यासाठी व्हिसा उपलब्ध होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे लसीकरणाचे वेगळे पुरावे सादर करण्याऐवजी लसीकरण सर्टिफिकेटच पासपोर्टला जोडण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय.