विजय माल्याला इडीने दिला झटका, फ्रान्समधील १४ कोटींची मालमत्ता केली जप्त

ईडीने विजय माल्ल्याची फ्रान्समधील मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता जवळजवळ १४ कोटींची असल्याचे ईडीने सांगितले. फ्रान्सने कारवाई केल्यानंतर ही माहिती दिली आहे. या वृत्ताला ईडीनेही दुजोरा दिला आहे.

दिल्ली : आर्थिक फसवणूक करुन फरार झालेल्या विजय माल्ल्याला ईडीने चांगलाच झटका दिला आहे. ईडीने विजय माल्ल्याची फ्रान्समधील मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या सांगितल्यानंतर फ्रेंच अधिकाऱ्यांनीह ही कारवाई करत मालमत्ता जप्त केली आहे. विजय माल्ल्याने स्टेट बँक आणि इतर बँकांचे कर्ज बुडवले आहे. कर्ज बुडवून विजय माल्याने परदेशात पळ काढला आहे.

आता ईडीने विजय माल्ल्याची फ्रान्समधील मालमत्ता जप्त केली आहे. ही मालमत्ता जवळजवळ १४ कोटींची असल्याचे ईडीने सांगितले. फ्रान्सने कारवाई केल्यानंतर ही माहिती दिली आहे. या वृत्ताला ईडीनेही दुजोरा दिला आहे. याबाबत ईडीने म्हटले आहे की, आम्ही फ्रान्समधील विजय माल्ल्याची मालमत्ता जप्त करण्यास सांगितले होते. त्यांनतरच फ्रान्सने ही कारवाई केली असल्याचे सांगितले.

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला जानेवारी २०१९ मध्ये विजय माल्ल्याला आर्थिक गुन्ह्यांतर्गत न्यायालयाने फारार गुन्हेगार म्हणून घोषित केले आहे. तेव्हापासून विजय माल्ल्या परदेशात वास्तव्यास आहे. विजय माल्ल्याच्या प्रत्यर्पणासाटी भारत प्रयत्न करत आहे. यासाठी ब्रिटनमध्ये विजय माल्ल्याच्या प्रत्यर्पणाचा खटला सुरु आहे.