पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, १ भारतीय जवान शहीद

  • Violation of arms embargo by Pakistan, 1 Indian soldier martyred

पूँछ – देशावर कोरोनाचे संकट घोंगावत असताना सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहेत. पाकिस्तान वारंवार सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. पाकिस्तानने पूँछ आणि बालाकोट येथील हिंदुस्थानी सीमेवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात हिंदुस्थानचा एक जवान शहीद झाला आहे. 

पूँछ जिल्ह्यात कर्नी सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार केला या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. परंतु बालाकोट येथे पाकिस्तानी सैन्याने सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्यावरही भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले आहे. या गोळीबारात एका भारतीय जवानाला वीरमरण आले आहे. हि घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली आहे.