vistara

कोरोना संकटामध्ये विस्तारा कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांना(free air travel to doctor and nurses) मोफत ये-जा करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली: विस्तारा(Vistara special offer) या विमान कंपनीने देशांतर्गत डॉक्टर आणि परिचारिकांसाठी खास ऑफर दिली आहे. कोरोना संकटामध्ये कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांना(free air travel to doctor and nurses) मोफत ये-जा करण्याची सुविधा देण्याची घोषणा केली आहे.

    नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाधी (Usha Padhee letter) यांना लिहिलेल्या पत्रात कंपनीने या ऑफरबद्दल माहिती दिली आहे. तसेच कंपनीने म्हटले आहे की, संकटाच्या वेळी आम्ही या योद्धांच्या सर्व सुविधांची काळजी घेऊ.

    उषा पाधी यांनी आपल्या ट्विटमध्ये विस्ताराच्या पत्राबद्दल माहिती दिली आहे. सरकारी संस्था आणि रुग्णालयांच्या तातडीच्या गरजा भागविण्यासाठी विस्तारा हवाई वाहतुकीची सुविधा देण्यास तयार आहे. या व्यतिरिक्त कोरोनाशी सामना करण्यासाठी कंपनीने देशभरातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या विनामूल्य हवाई प्रवासाचा प्रस्ताव दिला आहे. आपण एकत्र या संकटाशी लढाऊ या, असंही विस्तारानं सांगितल आहे.

    कंपनीने म्हटले आहे की, ते फ्रंटलाईन कामगारांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी विनामूल्य घेऊन जाणार आहेत. आपल्या डॉक्टर आणि परिचारिकांना एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी ये-जा करण्याची सुविधा देऊ शकल्यास आम्हाला खूप आनंद होईल, असे पत्रात म्हटलेय. काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यांना त्यांच्या जागी परत पाठवण्याची जबाबदारी देखील घेऊ शकतो.

    विस्तारा यांनी आपल्या निवेदनात असेही म्हटले आहे, की जागांची मर्यादीत उपलब्धता लक्षात घेता आम्ही वैद्यकीय डॉक्टर्स आणि नर्सेसना पहिल्यांदा आल्यास पहिल्या जागा उपलब्ध करून देणार आहोत.