BSF

सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ आणि आसाम रायफल्स या निमलष्करी दलातील 81007 जवानांनी 2011 ते 2020 या कालावधीत स्वेच्छा निवृत्ती घेतली असून 15904 जवानांनी राजीनामी दिल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. 2013 मध्ये सर्वाधिक 2332 जवानांनी राजीनामा दिल्याचे मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

  दिल्ली : 2011 ते 2020 या दहा वर्षांच्या कालावधीत देशातील सहा निमलष्करी दलातील 81 हजारहून अधिक जवानांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाने दिली आहे. याच कालावधीत सुमारे 16,000 जवानांनी राजीनामा दिल्याचेही मंत्रालयाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. कौटुंबिक तसेच आरोग्याची कारणे तसेच करिअरच्या चांगल्या संधी मिळाल्याची कारणे यामागे असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

  सीआरपीएफ, बीएसएफ, आयटीबीपी, एसएसबी, सीआयएसएफ आणि आसाम रायफल्स या निमलष्करी दलातील 81007 जवानांनी 2011 ते 2020 या कालावधीत स्वेच्छा निवृत्ती घेतली असून 15904 जवानांनी राजीनामी दिल्याचे गृह मंत्रालयाने म्हटले आहे. 2013 मध्ये सर्वाधिक 2332 जवानांनी राजीनामा दिल्याचे मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटले आहे.

  चांगले करिअर, कुटुंबासाठी दलातून बाहेर

  निमलष्करी दलातून स्वेच्छा निवृत्ती घेण्यामागे तसेच राजीनामा देण्यामागे वैयक्तिक व कौटुंबिक कारणांसह आरोग्य आणि करिअरच्या चांगल्या संधी अशी कारणे असल्याचे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, देशातील सहा निमलष्करी दलात सुमारे 10 लाख जवान कार्यरत आहेत.

  बीएसएफमधून सर्वाधिक निवृत्ती

  या कालावधीत बीएसएफमधून सर्वाधिक 36768 जवानांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. त्याखालोखाल सीआरपीएफमधून 26164, सीआयएसएफमधून 6705, आसाम रायफल्समधून 4947, एसएसबीमधून 3230 आणि आयटीबीपीमधून 3193 जवानांनी स्वेच्छा निवृत्तीचा पर्याय स्वीकारला आहे. यापैकी 2017 मध्ये सर्वाधिक 11728 जवानांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर 2011 मध्ये सर्वाधिक 11260 जवानांनी, 2012 मध्ये 10859, 2013 मध्ये 9355, 2016 मध्ये 6981, 2014 मध्ये 5931, 2015 मध्ये 1686 जणांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली.